टाकरखेड्यात चिक्कीमध्ये पुन्हा रबर

By Admin | Updated: July 12, 2015 00:34 IST2015-07-12T00:34:44+5:302015-07-12T00:34:44+5:30

तालुक्यातील टाकरखेडा संभू येथील जि.प. उर्दू हायस्कूलमध्ये चिक्कीत पुन्हा रबर आढळून आल्याने खळबळ उडाली असून चिक्कीचे वाटप बंद करण्यात आले आहे.

Rubber in Chikki in Tokerkheda | टाकरखेड्यात चिक्कीमध्ये पुन्हा रबर

टाकरखेड्यात चिक्कीमध्ये पुन्हा रबर

सूर्यकांता चिक्की चर्चेचा विषय : जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलमधील प्रकार
भातकुली : तालुक्यातील टाकरखेडा संभू येथील जि.प. उर्दू हायस्कूलमध्ये चिक्कीत पुन्हा रबर आढळून आल्याने खळबळ उडाली असून चिक्कीचे वाटप बंद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सूर्यकांता चिक्की सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आठ दिवसांपूर्वी टाकरखेडा संभू येथील अंगणवाडी केंद्रात चिक्कीत लोखंडी खुंटी आढळली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी धामणगाव तालुक्यातील एका गावात चिक्कीमध्ये रबर आढळून आला होता.
चिक्की पुन्हा अजिंठ्यावर आली असून टाकरखेडा संभू येथील उर्दू शाळेत चिमुकल्यांना खाण्याकरिता चिक्कीचे वाटप करण्यात आले होते. यातील रहेमान पटेल यांच्या घरी दिलेल्या एका चिक्कीमध्ये रबर आढळून आला. त्यांनी उर्दू शाळेत धाव घेऊन ती चिक्की उपस्थितांना दाखविली. या प्रकरणाची माहिती मिळताच सरपंच चन्द्रशेखर गेडाम, वैद्यकीय अधिकारी भिसे, सुपरवायझर अर्चना काळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. एका आठवड्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असतानादेखील जिल्ह्यात चिक्कीचे वाटप सुरु असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rubber in Chikki in Tokerkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.