शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओच्या खात्यात ३९ कोटी ७६ लाखांचे महसूल, अवजड वाहने लक्ष्य, बेकायदेशीर वाहतूक रडारवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:38 IST

अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१७ या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत कर, वाहन तपासणीतून ३९ कोटी, ७६ लाख ५२ हजार रुपये वसूल करून महसूल खात्यात जमा केले आहे.

अमरावती -  अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१७ या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत कर, वाहन तपासणीतून ३९ कोटी, ७६ लाख ५२ हजार रुपये वसूल करून महसूल खात्यात जमा केले आहे.आरटीओ कार्यालयाच्यावतीने वर्षभरात चारचाकी वाहनचालकांकडे आॅटो पोल्युशन कंट्रोल पावती, क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक, वाहन परवाना, चालक परवाना, फिटनेस प्रमाणपत्र अशा विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी अनेक वाहनचालकांकडे कागदपत्रे आढळून आली नाहीत. परिणामी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. १ एप्रिल ते सप्टेंबर २०१७ ला कालखंडात आरटीओच्यावतीने ५०२ वाहने तपासणी करण्यात आली. यामध्ये वाहनचालकांकडे पीयूसी, वाहन फिटनेस प्रमाणपत्र, अवजड वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी १४ जणांवर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच वाहनचालकांकडून तडजोड शुल्क वसूल करण्यात आला आहे. न्यायालयीन दंडासह आरटीओच्या तिजोरीत जमा झाले आहे. तसेच चारचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेषत: क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारे वाहनचालक, प्रदूषणयुक्त वाहतूक करणारे, चालक वाहन परवाना नसणे अशा नियमांचे उल्लंघन करणाºया एकूण २१६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १६२ वाहनांवर तडजोडीतून ४ कोटी ३२ लाख ७४८ रुपये  वसूल करण्यात आले आहे. तसेच १४ वाहनचालकांवर न्यायालयीन खटले सुरू आहेत. पीयूसीशिवाय वाहन चालवून पर्यावरणात प्रदूषणाची वाढ करणाºया वाहनचालकांविरुद्ध आरटीओने कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. आरटीओ कार्यालयाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली. दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारे वाहनचालक आणि नियमबाह्य वाहतूक करणाºयाविरोधात कारवाईसाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. नियमित वाहन तपासणीत ५०२ वाहनांकडून २ कोटी, २२ लाख २०० रुपये वसूल करण्यात आलेत. अवजड वाहतूकप्रकरणी २१६ वाहने तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६२ वाहनचालकांविरुद्ध तडजोड शुल्क असे ४ कोटी ३२ लाख ७४८ रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रादेशिक परिवहन आयुक्तांच्या सूचनेनुसार नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर दंडासह न्यायालयीन कारवाई केली जाईल, अशी तयारी आरटीओ कार्यालयाने चालविली आहे.दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविताना कागदपत्रे जवळ बाळगणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. यापुढे बेकायदेशीर वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा वेग वाढविला जाईल.- विजय काठोडे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

टॅग्स :Policeपोलिस