आरटीई प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST2021-07-25T04:12:15+5:302021-07-25T04:12:15+5:30

अमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या १,९८० विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ...

RTE admission re-extended | आरटीई प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ

आरटीई प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ

अमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या १,९८० विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय सोडत प्रक्रियेत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत.

आरटीई अंतर्गत जिल्ह्यात शनिवारी दुपारपर्यंंत १,३९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित ५८९ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची संधी मिळूनही प्रवेश घेतला नाही. या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाढीव मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. जिल्ह्यात आरटीई प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत १ हजार ३९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यापूर्वी पहिल्यांदा ३० जून ही प्रवेशाची मुदत संपल्यानंतर दुसऱ्यांदा ९ जुलै व त्यानंतर २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता शिक्षण विभागाने पुन्हा ही मुदत संपल्यानंतर प्रवेश प्रक्रियेसाठी ३१ जुलैची डेडलाईन दिलेली आहे. शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया निश्चित करू न शकलेल्या पालकांना दिलासा दिला आहे.

Web Title: RTE admission re-extended