एमपीएससी परीक्षेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना आरटी-पीसीआर बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:41+5:302021-03-19T04:12:41+5:30
अमरावती : राज्य शासनाच्या विविध विभागांतील गट (अ) व गट (ब) संवर्गातील पदभरतीसाठीची एमपीएससी पूर्व परीक्षा होणार आहे. तत्पूर्वी ...

एमपीएससी परीक्षेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना आरटी-पीसीआर बंधनकारक
अमरावती : राज्य शासनाच्या विविध विभागांतील गट (अ) व गट (ब) संवर्गातील पदभरतीसाठीची एमपीएससी पूर्व परीक्षा होणार आहे. तत्पूर्वी परीक्षा केंद्रांवरील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांनी आरटी-पीसीआर चाचणी करणे लोकसेवा आयोगाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी बचत भवन परिसरात केंद्र सुरू करण्यात आले असून, सर्वांनी शुक्रवारीच चाचणी करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
परीक्षेसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी या चाचणी केंद्रावर वेळेत येऊन स्वॅब द्यावा व वेळीच अहवाल प्राप्त करून घ्यावा. त्यासाठी संबंधितांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. एखाद्या कर्मचाऱ्यांच्या चाचणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्यास त्याची उपचाराची वेळीच पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे व परीक्षा केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुरेसा स्टाफ उपलब्ध ठेवला जाईल. परीक्षा निकोप वातावरणात पार पडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत.