सेंद्रिय शेतीसाठी ३९ कोटी रुपयांची तरतूद
By Admin | Updated: August 6, 2016 00:08 IST2016-08-06T00:08:52+5:302016-08-06T00:08:52+5:30
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेती पिकासाठी केंद्राचा यंदा २३ कोटी ७४ लाख ८३ हजार रुपये व राज्य हिस्सा १५ कोटी ८३ लाख २२ हजार गटांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सेंद्रिय शेतीसाठी ३९ कोटी रुपयांची तरतूद
शाश्वत शेती अभियान : शेतकरी गटांना देणार प्रशिक्षण
अमरावती : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेती पिकासाठी केंद्राचा यंदा २३ कोटी ७४ लाख ८३ हजार रुपये व राज्य हिस्सा १५ कोटी ८३ लाख २२ हजार गटांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या अंतर्गत ९३२ शेतकरी गटाचे प्रशिक्षण व ५० शेतकऱ्यांचे तीन प्रशिक्षण शिबिरे आयोेजन करण्यात येणार आहे. एका प्रशिक्षणास २० हजार असे एकूण ६० हजार रुपये यावर खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्राचा २ कोटी २३ लाख ६८ हजार व राज्याचा हिस्सा १ कोटी ४९ लाख १२ हजार रुपये राहणार आहे.
याच अंतर्गत दोन दिवसांचे गटनेत्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ४०० रुपये प्रमाणे ९३२ गटनेत्यांच्या प्रशिक्षणासाठी ३ लाख ७३ हजार खर्च करण्यात येणार आहे. प्रतिशेतकरी गटाचे २१ व १९० रुपये प्रति नमुना याप्रमाणे ९३२ गटासाठी ४६ लाख ६० हजारांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
सेंद्रीय शेतीची ४०० रुपये प्रति तपासणी यासाठी प्रति वर्षाच्या तीन तपासण्यासाठी ११ लाख १८ हजार रुपये खर्च करण्यास वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतीचा सामू घसरत चालला आहे विढविला आहे. त्यामुळे याकडे लक्ष वेधले जात आहे. (प्रतिनिधी)
सेंद्रिय ग्राम संकल्पनेसाठी ६ कोटी ९९ लाखांचा निधी
सेंद्रीय शेतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रति एकर क्षेत्र मर्यादित हजार रुपये प्रतिएकरप्रमाणे ९३२ शेतकरी गटांसाठी ४ कोटी ६६ लाख व पीक पद्धतीत बदल करणे, सेंद्रिय बीजनिर्मिती सेंद्रीय रोपवाटिका तयार करणे, यासाठी प्रति एकर, प्रतिवर्ष ५०० रुपये याप्रमाणे ९३२ शेतकरी गटासाठी २ कोटी ३३ लाख असा एकूण ६ कोटी ९९ लाखांच्या निधीस वित्तीय मान्यता देण्यात आलेली आहे.