शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

महापालिकेवर ३१९ कोटींची उधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:08 IST

भाजपक्षाची निर्विवाद सत्ता असलेल्या महापालिकेला तब्बल ३१९ कोटींची देणी चुकवायची आहेत. डोईवर कर्जाचा डोंगर असल्याने शासनाकडून येणाऱ्या तोकड्या निधीवर महापालिकेचा आर्थिक डोलारा उभा असून, प्रशासन विकासकामांबाबात बॅकफूटवर आले आहे.

ठळक मुद्देमजीप्राची ५० कोटी देणी : सत्ताधीशांचा पाठपुरावा कमी, प्रशासनही माघारले

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भाजपक्षाची निर्विवाद सत्ता असलेल्या महापालिकेला तब्बल ३१९ कोटींची देणी चुकवायची आहेत. डोईवर कर्जाचा डोंगर असल्याने शासनाकडून येणाऱ्या तोकड्या निधीवर महापालिकेचा आर्थिक डोलारा उभा असून, प्रशासन विकासकामांबाबात बॅकफूटवर आले आहे. मागील आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीचा निधी वगळता एकही रुपया नगरसेवकांना मिळाला नसल्याने त्यांच्यातही असंतोष पसरला आहे. दुसरीकडे देणी थकल्याने पाणी व वीज पुरवठा खंडीत होण्याचे संकट महापालिकेवर घोंगावते आहे.उत्पन्नाचे मर्यादित स्रोत आणि मालमत्ता कर निर्धारण न झाल्याने महापालिकेच्या आर्थिक मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. मागील तीन वर्षांपासून महापालिकेचे महसुली उत्पन्न ८० कोटींवर स्थिरावल्याने प्रशासनावरील दायित्वात मोठी वाढ झाली आहे. नगरविकास विभागाकडून येणाºया निधीसह चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवर महापालिकेची आर्थिक मदार अवलंबून आहे. स्थानिक संस्था कराच्या नुकसानापोटी येणाºया रकमेतून महापालिका कर्मचाºयांच्या वेतनाचा खर्च भागविला जातो. त्यामुळे अन्य कुठल्याही बाबींवर खर्च करण्यास महापालिकेला मर्यादा येतात. त्यामुळेच दिवसेंदिवस महापालिकेवर असलेल्या उधारीत कोट्यवधींनी वाढ होत आहे.सहाव्या आयोगाप्रमाणे कार्यालयीन अधिकारी कर्मचारी व शिक्षकांची वेतन थकबाकी ३० कोटींवर पोहोचली आहे. जानेवारी २००६ ते एप्रिल २०१० या कालावधीतील ती थकबाकी आहे, तर सेवानिवृत्त कार्यालयीन अधिकारी कर्मचारी व शिक्षकांच्या निवृतीवेतनाची थकबाकी १ कोटी रुपये आहे. सेवानिवृती उपदान, सेवानिवृती अंशराशीकरण, अर्जित रजा, कर्मचाºयांचे सेवा उपदान, थकबाकी रजा रोखीकरण व डीसीपीएसची थकबाकी तब्बल २०.५० कोटींवर पोहोचली आहे. एकंदर येणाºया उत्पन्नातून ही भलीमोठी थकबाकी द्यायची की दैनंदिन आस्थापना खर्च चालवायचा, ही गोळाबेरीज करण्याची मोठी कसरत प्रशासनप्रमुखांना करावी लागत आहे. त्यामुळेच की काय, मागील एक दीड वर्षांपासून महापालिका आर्थिकदृष्ट्या नादारीस आली आहे.कंत्राटदारांचे ८० कोटी थकीतबांधकाम कंत्राटदारांचे महापालिकेवर तब्बल ८० कोटी रुपये थकीत आहेत. नोंव्हेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालवधीतील नगरसेवकांचे ५९ लाख रुपये मानधन प्रलंबित आहे. पाणीपुरवठा थकीत देयकांचा आकडा १३ कोटींवर पोहोचला आहे. याशिवाय फेब्रुवारी १७ ते डिसेंबर १७ या कालावधीतील विद्युत देयकाची थकबाकी १४.४० कोटी आहे, तर ८० लाख रुपये पुरवठादारांना द्यायचे आहेत. सुमारे ७० लाख रुपये सुरक्षा अनामत रक्कम परत करण्याचे आव्हानही महापालिकेसमक्ष आहे.