आर.आर. लाहोटी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:04 IST2021-08-02T04:04:29+5:302021-08-02T04:04:29+5:30
मोर्शी : श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्थानिक आर.आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व यशवंतराव ...

आर.आर. लाहोटी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
मोर्शी : श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्थानिक आर.आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकताच पार पडला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे होते. मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक अंबादास मोहिते, वैभव म्हस्के, प्राचार्य जी.आर. तडस, केंद्र संयोजक सुधर्म हांडे व ग्रंथपाल रविकांत महिंदकर प्रामुख्याने उपस्थित होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ४८ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या आठ शिक्षणक्रमाच्या ५४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात करण्यात आले. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी अतिष कोहळे, एन.डी. कोळेकर, शेखर चौधरी, रजनी गिद, पूजा बागडे, आरती बागडे, आरती गेडाम, हर्षल लुंगे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय सुधर्म हांडे यांनी केले. संचालन सरिता पुनासे व आभार प्रदर्शन रवींद्र धांडे यांनी केले.