रिपाइं कार्यकर्त्यांची महापालिकेवर धडक

By Admin | Updated: February 18, 2015 00:09 IST2015-02-18T00:09:15+5:302015-02-18T00:09:15+5:30

महापालिकेने स्थानिक सिध्दार्थनगरतील सुमारे ७० नागरिकांचे अतिक्रमण काढले. त्यामुळे या घरांचे पुनर्वसन करून त्यांना मालकी हक्काची जागा देण्याची मागणी ...

RPI activists hit the municipal corporation | रिपाइं कार्यकर्त्यांची महापालिकेवर धडक

रिपाइं कार्यकर्त्यांची महापालिकेवर धडक

अमरावती : महापालिकेने स्थानिक सिध्दार्थनगरतील सुमारे ७० नागरिकांचे अतिक्रमण काढले. त्यामुळे या घरांचे पुनर्वसन करून त्यांना मालकी हक्काची जागा देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने महापालिका आयुक्त अरूण डोंगरे यांचेकडे कमलताई गवई यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
नवसारी प्रभागातील सिध्दार्थनगर येथे मागील २० वर्षापासून ७० कुटुंब राहतात. काही दिवसांपूर्वी महापालिकेने येथील अतिक्रमणातील सर्व घरे हटविली. त्यामुळे ही कुटुंब उघडयावर आली. महापालिकेने या कुटुंबांचे पुनर्वसन करून त्यांना आपल्या मालकी हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रिपाई कार्यकर्त्यांनी आयुक्तांकडे रेटून धरली. याबाबत आयुक्तांशी कमलताई गवई यांनी चर्चा केली असता यासंदर्भात आयुक्त अरूण डोंगरे यांनी आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन डोंगरे यांनी दिले.
आंदोलनात कमलताई गवई, अमोल इंगळे, उमेश इंगळे, सविता भटकर, संजय गायकवाड, वैशाली गायकवाड, मनोज थोरात , सुनिल थोरात, रंजना घरडे, विद्या तानोडकर, सविता तायडे, सुजाता गायकवाड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: RPI activists hit the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.