रस्त्यावरील वृक्षांची राजरोसपणे कत्तल

By Admin | Updated: July 30, 2015 00:18 IST2015-07-30T00:18:46+5:302015-07-30T00:18:46+5:30

शासन विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च करते.

The royal slaughter of the trees on the street | रस्त्यावरील वृक्षांची राजरोसपणे कत्तल

रस्त्यावरील वृक्षांची राजरोसपणे कत्तल

प्रशासनाचे दुर्लक्ष : ‘झाडे लावा झाडे जगवा’ मोहिमेचा फज्जा
किरण होले  दर्यापूर
शासन विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिसरात हिरव्याकंच उभ्या वृक्षांची बेधडक कत्तल सुरू असून यामुळे हा परिसर उघडा बोडखा दिसू लागला आहे.
तालुक्यात कधीकाळी वृक्षांचे प्रमाण मोठे होते. परंतु या ना त्या कारणामुळे सतत सुरू असलेल्या वृक्षकटाईमुळे आज वृक्षांची संख्या निम्यावर आली आहे. सहा ते सात महिन्यांपासून तालुक्यातील हिरव्या वृक्षांवर कुठाराघात सुरू केला आहे. येथील राजस्व विभागाच्या एकाही अधिकाऱ्याचे या रानवैर्यांच्या विरोधात साधी दंडात्मक कारवाई सुध्दा केलेली नाही. तशी एकही नोंद दफ्तरी नाही.गलेलठ पगार घेणारे अधिकारी कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रोठवरील वृक्षांमुळ सौंदर्य दिसून येते. वृक्षमाफीयांची वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत सतत आर्थिक देवाणघेवाण सुरु असते. त्यामुळेच हे वृक्षमाफिया राजरोसपणे कोणालाही न घाबरता हिरव्यागार वृक्षांची अवैध कत्तल करताना दिसून येतात. या वृक्षमाफीयांवर तत्काळ कारवाई करुन वृक्षकटांवर अंकुश न लावल्यास काही काळानंतर तालुक्याला वाळवंटाचे स्वरुप आल्याशिवाय राहणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी लाकूड तस्करांविरध्द प्रखल पाऊल उचलून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी हिरव्यागार उभ्या वृक्षांची साठवणूक होत असेल अशा ठिकाणी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे..

Web Title: The royal slaughter of the trees on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.