ग्राहकांचा ओढा : परप्रांतातून फुलझाडे विक्रेत्यांचे आगमन, विविध जातीचे रोपटेअमोल कोहळे पोहराबंदीएकीकडे पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. यंदाही निसर्गाने पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दरवर्षी हिवाळ्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात ठिकठिकाणी फुलांची विक्री करण्याकरिता येणारे विक्रेते उशिरा दाखल झाले आहेत. ग्रामीण भागात सध्या ठिकठिकाणी रंगीबेरंगी फुले विक्रीला आली आहेत. ग्रामीण भागात ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असलेली ही फुले ग्राहकांचे मन मोहून घेत आहेत. ग्रामीण भागात घराच्या अंगणात एरवी रंगीबेरंगी फुले बहरेली दिसून येतात. ही फुले येणाऱ्या-जाणाऱ्यांना आकृष्ट करतात. केवळ घर, अंगणाची शोभा वाढविण्याकरिता फुलांची महागडी रोपटी ग्रामीण भागातील लोक खरेदी करीत नाहीत. ही रोपटी या मार्गाने जाणारे-येणारे लोक खरेदी करतात. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीलाच शहरातील वर्दळीचे रस्ते येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. परप्रांतातून दरवर्षी रंगीबेरंगी, तेवढीच आकर्षक विविध जातींची फुलझाडे विक्रीसाठी उपलब्ध असतात. यंदा पावसाचे वेळेवर आगमन झाले नाही. पावसाने दडी मारल्याने फुले व फुलझाडे विक्रेत्यांवर विपरीत परिणाम झाला. सध्या अमरावती शहर सोडले तर ग्रामीण भागातील बसस्थानक, गावातील मुख्य चौकात मोजकेच फुलविक्रेते दिसून येत आहेत. विविध जातीच्या रोपट्यांची किंमत रोपट्यांचे वयानुसार ठरविली जाते, असे विक्रेत्यांनी सांगतिले. बंगालवरून आणलेल्या आकर्षक कुंड्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
रंगीबेरंगी फुलांनी बहरले ग्रामीण भागातील रस्ते
By admin | Updated: December 24, 2015 00:10 IST