शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

बोंडअळीमुळे त्रस्त  शेतक-याने उभ्या कपाशीवर फिरविला रोटाव्हेटर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 10:03 IST

कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे हाती येणारे उत्पन्न गेले. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयाने चक्क तीन एकरातील कपाशीवर रोटाव्हेटर चालविले

वीरेंद्रकुमार जोगी अमरावती - कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे हाती येणारे उत्पन्न गेले. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयाने चक्क तीन एकरातील कपाशीवर रोटाव्हेटर चालविले. चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड बाजार येथील शेतकरी राजेंद्र देशमुख यांनी बीटी बियाणे नसल्याचा आरोप करीत गुन्हे कंपनीवर गुन्हे नोंदविण्यात यावे अशी मागणी केली आहे.  

राजेंद्र देशमुख यांनी आपल्या पाच एकर शेतात ‘मोक्ष’ या आदित्य कंपनीच्या वाणाची पेरणी केली. पिकांची चांगल्या पद्धतीने मशागत केली. त्यांची पºहाटीही चांगली आली. पात्याही आल्या. कपाशीच्या झाडाला १०० ते १२० बोडे धरू लागली होती. मात्र, बोंड धरीत असताना त्यावर गुलाबी बोंड अळी (पिंक ब्लो) चा प्रादुर्भाव झाला. झाडावरील ९० टक्के बोंडांवर अळी आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे बियाणे नॉन बीटी असल्याचे तक्रार शेतकºयाने तालुका कृषी अधिकाºयांकडे केली. त्यानुसार कृषी अधिकाºयांनी पाहणी केली. अनेकांशी चर्चा केल्यावर या कपाशीपासून आता उत्पन्न होणार नाही असा अंदाज आल्याने राजेंद्र यांनी चक्क रोटाव्हेटर फिरवून तीन एकरातील कपाशीवर रोटाव्हेटर चालविण्या निर्णय घेतला. यामुळे त्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. 

३५ हजारांचा खर्च, उत्पन्न शुण्य शेतकरी राजेंद्र यांनी पाच एकरात लावलेल्या कपाशीसाठी सुमारे ३५ हजारांचा खर्च केला. बियाणे, खत, किटकनाशक, मजुरी याचा यात समावेश आहे. मागील अनेक वर्षांपासून ते कपाशीचे उत्पादन घेत असून एकरी २० क्विंटलपर्यंत त्यांनी उत्पादन घेतले आहे. यंदा त्यांना पेरणी केल्यानंतर एकाही छदाम हाती लागला नाही. 

बीटीच्या नावाने बियाणे विकणाºया कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो, मात्र हाती काहीच येत नसेल तर आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. अशा संकट अस्मानी नव्हे तर सुल्तानी आहे.-  राजेंद्र देशमुख, शेतकरी,  येरड बाजार, चांदूर रेल्वे 

टॅग्स :Farmerशेतकरी