सभापतिपदासाठी रस्सीखेच

By Admin | Updated: September 13, 2014 23:34 IST2014-09-13T23:34:42+5:302014-09-13T23:34:42+5:30

रविवार १४ सप्टेंबर रोजी दर्यापूर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सभापतीपदाकरिता रस्सीखेच सुरू आहे.

Rope for chairmanship | सभापतिपदासाठी रस्सीखेच

सभापतिपदासाठी रस्सीखेच

दर्यापूर : रविवार १४ सप्टेंबर रोजी दर्यापूर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सभापतीपदाकरिता रस्सीखेच सुरू आहे.
सभापतीपदासाठी शिवसेनेच्या विद्यमान सभापती मंगला रहाटे व रिपाइंच्या रेखा वाकपांजर यांनी दावा केला. याकरिता अमरावती येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची शनिवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. इकडे काँग्रेससुध्दा सत्ता हस्तगत करण्यासाठी इतर सदस्यांना फोडण्याच्या तयारीला लागली आहे. यामध्ये राष्ट्रवादी व भारिप-बमसंच्या सदस्यांची भूमिका किंगमेकरची ठरणार आहे.
दर्यापूर पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता असून सेनेचे ३, काँग्रेसचे २, भारिप-बहुजन महासंंघाचा १, रिपाइं १ व राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेना, रिपाइं व राकाँच्या युतीतून अडीच वर्षांकरिता शिवसेनेच्या मंगला रहाटे यांना सभापती तर राष्ट्रवादीचे रामेश्वर इंगळे यांंना उपसभापती करण्यात आले होते. यावेळी सभापतीपद सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित असल्याने मंगला रहाटे व रेखा वाकपांजर यांनी दावा केला आहे. तर रामेश्वर इंगळे यांनी पुन्हा उपसभापती करा, अशी अट टाकल्याचे समजते. पण, सभापती पद रिपाइंला मिळाले तर उपसभापतीपदाकरिता शिवसेनेचे संजय देशमुख व संजय चव्हाण इच्छुक आहेत. काँग्रेसकडे दोन महिला उमेदवार आहेत.

Web Title: Rope for chairmanship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.