जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गुटख्याचे फर्रे
By Admin | Updated: June 22, 2016 00:13 IST2016-06-22T00:13:51+5:302016-06-22T00:13:51+5:30
गुटखा बंदी असतानाही शहरात अवैध गुटखा विक्री सर्रास सुरु आहे. यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने अन्न औषधी प्रशासन विभगाचे अधिकारी ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गुटख्याचे फर्रे
अमरावती : गुटखा बंदी असतानाही शहरात अवैध गुटखा विक्री सर्रास सुरु आहे. यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने अन्न औषधी प्रशासन विभगाचे अधिकारी पाठराखण करित असल्याचा आरोप युवा स्वाभिमान संघटनेने केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गुटख्याचे फर्रेच निवेदनकर्त्यांनी नेले. खुलेआम सुरू असलेल्या गटखा विक्रीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.
शहरातील महाविद्यालय, शाळा समोर, किराणा दुकान, दवाखाने, सिनेमा हॉल व सार्वजनिक व धार्मिक ठिकाणी गुटखा विक्री खुलेआम सुरु आहे. अवैध गुटखा शहरामध्ये कुठून येतो, याचा शोध घेऊन तातडीने अवैध गुटखा बंदीवर लगाम घालण्याची मागणी युवा स्वाभिमानचे संजय हिंगासपुरे, शैलेंद्र कस्तुरे, नीलेश मेश्राम, राजेश वानखडे, नीलेश भेंडे, आशिष गावंडे, दिलीप वऱ्हाड, विजय जायस्वाल यांनी केली आहे. यावर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. दरम्यान याबाबत तातडीने कारवाईचे निर्देश संबंधित विभागाला देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)