खातरजमा केल्यानंतर कारवाईची भूमिका
By Admin | Updated: March 20, 2016 00:16 IST2016-03-20T00:16:38+5:302016-03-20T00:16:38+5:30
महापालिकेच्या शुक्रवारच्या आमसभेत नेमके काय घडले, त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे;...

खातरजमा केल्यानंतर कारवाईची भूमिका
रणजित पाटील : कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची पाठराखण करू
अमरावती : महापालिकेच्या शुक्रवारच्या आमसभेत नेमके काय घडले, त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे; तथापि स्थायी समितीला डावलून एखादा निर्णय बेकायदेशीरपणे घेतला असेल तर तक्रार आल्यानंतर चौकशी केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
'मीट द प्रेस'मध्ये त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास चर्चा केली. दोषी आढळल्यास कारवाई होईल मात्र, कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहण्याची राज्य सरकारची भुमिका आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. घरकुल मंजुरीवरून शहरात रंगलेल्या मानापमान नाट्यावर त्यांनी सावध प्रतिक्रीया दिली.
अर्थसंकल्पात विदर्भाला भरभरून मिळाले आहे. यात दंत महाविद्यालयासह बुलडाण्याला मंजुर झालेल्या कृषी महाविद्यालयाचा अंतर्भाव आहे. निकषात बसणाऱ्या रुग्णालयांना राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णांना सेवा देता येणार आहे. तसेच कृषीक्षेत्राला मोठा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. पक्षादेश असल्यास निवडणूक लढू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अमरावतीतील अनधिकृत इमारतींचे बांधकाम, विद्यापीठांचा कायदा आदी मुद्यांवर त्यांनी दिलखुलास चर्चा केली. यावेळी भाजपाचे प्रदेशप्रवक्ते शिवराय कुळकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)