शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

रॉड, चाकूने हल्ला करून युवकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 5:00 AM

मार्डी मार्गावरील अंबिकानगरनजीक रविवारी घडली. अंकुश उर्फ अंकित सदानंद तायडे (२०, रा. वडाळी), असे मृताचे नाव आहे. या घटनेतील अनिकेत देविदास चिंचखेडे (२०, रा. राहुलनगर), अक्षय प्रशांत राठोड (२३, रा. गुरुकृपा कॉलनी), मिखाईल संदीप बन्सोड (१९, रा. जेल कॉर्टरजवळ) या तिघांना फ्रेजरपुरा पोलिसांनी रविवारी अटक केली.

ठळक मुद्देमार्डी मार्गावरील घटना : दोन गटांत हाणामारी, युवक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धूलिवंदनाच्या दिवशी जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत युवकाची लोखंडी रॉड व चाकूचे १५ वार करून निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या गटातील युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शहरातील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहे. ही घटना मार्डी मार्गावरील अंबिकानगरनजीक रविवारी घडली. अंकुश उर्फ अंकित सदानंद तायडे (२०, रा. वडाळी), असे मृताचे नाव आहे.या घटनेतील अनिकेत देविदास चिंचखेडे (२०, रा. राहुलनगर), अक्षय प्रशांत राठोड (२३, रा. गुरुकृपा कॉलनी), मिखाईल संदीप बन्सोड (१९, रा. जेल कॉर्टरजवळ) या तिघांना फ्रेजरपुरा पोलिसांनी रविवारी अटक केली. चौथा आरोपी मनीष प्रकाश बाहेकर याच्यावर दुसºया गटाने केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झाला. या प्रकरणात इतर चार अनोळखींचाही समावेश असून, एकूण आठ जणांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत अंकुश तायडे व त्याचे सहा मित्र धूलीवंदनानिमित्त राजुरा येथे मद्य पार्टीसाठी गेले होते. परत येताना घटनास्थळी अक्षय राठोड, मनीष बाहेकर, अनिकेत चिंचखेडे व इतर तीन ते चार अनोळखी इसमाने एकत्रित येऊन दुचाकीने जात असलेले अंकुश तायडे व त्याचा मित्र दीप करवाडे (२०) याला आरोपींनी रस्त्यात अडवून हल्ला चढविला. यामध्ये अंकुशवर लोखंडी रॉडने व चाकूने छातीवर, पोटावर व डोक्यावर वार केले. जीव वाचविण्यासाठी तो रस्त्याने पळत होता. मात्र, आरोपीने त्याचा काही अंतरापर्यंत फिल्मीस्टाईल पाठलाग केला. रक्ताच्या थोरड्यात पडलेल्या अंकुशला त्याचा मित्र दीप व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. फिर्यादी दीप राजेंद्र करवाडे (२०, रा. जिल्हा परिषद कॉर्टरजवळ याच्या तक्रारीवरून आठही आरोपीविरुद्ध भादविंच्या कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हे नोंदविले.याच भांडणात दुसºया गटाने केलेल्या हल्ल्यात मनीष प्रकाश बाहेकर हा गंभीर जखमी झाला. ही घटना मार्डी मार्गावर दुपारी २.१० वाजता दरम्यान घडली. जखमीचे वडील प्रकाश बापूराव बाहेकर (६३, रा. जलारामनगर प्रभा कॉलनी) यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रेम राजेश सरादे (२२, रा. प्रबुद्धनगर), अक्षय प्रकाश माटे (२५, रा. आशीयाना पोलीस क्लब वीट्टभट्टीनजीक), कुंदन रामकृष्ण बोरकर (२०), सूरज जितेंद्र तायडे (१९, दोन्ही रा. प्रबुद्धनगर वडाळी), दीप राजेंद्र करवाडे (२०, रा. जिल्हा परिषद कॉर्टर), शुभम श्रीधर गडलिंग (२२, रा. बिच्छुटेकडी राहुलनगर), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भादंवीच्या कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला. यात फिर्यादीचा मुलगा हा मनीष रंगपंचमी खेळण्यास मित्रासोबत गेला असता घटनास्थळी आरोपींनी संगनमताने त्याचेवर हल्ला चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा केला. हत्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत. याप्रकरणी गुन्ह्यातील तपास एपीआय बिपीन इंगळे करीत आहेत. रंगपंचमीच्या दिवशीत हत्या झाल्याने वडाळी परिसरात खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Murderखून