रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण : जुन्या दुखापती असलेल्या रुग्णांसाठी नवी आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2025 17:21 IST2025-07-08T17:19:51+5:302025-07-08T17:21:29+5:30

लोक पूर्वीच्या दुखापती किंवा इम्प्लांटमुळे होणाऱ्या गुडघेदुखीसोबत जगत राहतात. हे भीतीमुळे नाही, तर अनेकदा प्रगत उपचार पर्यायांबद्दलच्या जागरूकतेच्या अभावामुळे होते.

Robotic knee transplant is New hope for patients with old injuries | रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण : जुन्या दुखापती असलेल्या रुग्णांसाठी नवी आशा

रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण : जुन्या दुखापती असलेल्या रुग्णांसाठी नवी आशा

अमरावती - अनेक लोक पूर्वीच्या दुखापती किंवा इम्प्लांटमुळे होणाऱ्या गुडघेदुखीसोबत जगत राहतात. हे भीतीमुळे नाही, तर अनेकदा प्रगत उपचार पर्यायांबद्दलच्या जागरूकतेच्या अभावामुळे होते.

अमरावतीच्या सनशाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडलेल्या रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे, पूर्वीच्या पायाच्या फ्रॅक्चरमुळे आणि जुन्या इम्प्लांटमुळे वेदना आणि चालण्याच्या त्रासासह जगणाऱ्या एका ६४ वर्षीय व्यक्तीने आता बरं होण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पावलं टाकली आहेत. रोबोटिक तंत्रज्ञान अगदी गुंतागुंतीच्या परिस्थितीतही अचूक, सुरक्षित आणि प्रभावी उपाय प्रदान करते, ज्यामुळे रुग्णांना हालचाल करण्यास मदत होते.

ही शस्त्रक्रिया अत्यंत अनुभवी खांदा व क्रीडा दुखापत तज्ज्ञ (Shoulder and sports injury specialist), आर्थ्रोस्कोपी आणि सांधेरोपण सर्जन (arthroscopy and joint replacement surgeon) डॉ. धनंजय देशमुख यांनी अस्थिरोग तज्ज्ञ (orthopedic surgeon) डॉ. किशोर सोनवणे यांच्या साहाय्याने केली. पूर्वीच्या दुखापतीमुळे रुग्णाच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचे गंभीर नुकसान झाले होते (ऑस्टियोआर्थरायटिस). पूर्वीच्या ऑपरेशनमधील एक धातूची प्लेट (इम्प्लांट) आधीपासूनच त्यांच्या पायात असल्यामुळे शस्त्रक्रिया अधिक आव्हानात्मक झाली होती.

ही गुंतागुंत असूनही डॉ. देशमुख यांच्या टीमने रोबोटिक टोटलनी रिप्लेसमेंट आणि अर्धवट इम्प्लांट काढण्याची शस्त्रक्रिया—हे सर्व एकाच शस्त्रक्रियेत यशस्वीरित्या पार पाडले. अशा प्रकरणांमध्ये दोन वेगवेगळ्या शस्त्रक्रियांची आवश्यकता असते, परंतु रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने टीमने एकाच वेळी उच्च अचूकता आणि कार्यक्षमता प्राप्त केली. या दृष्टिकोनामुळे गुंतागुंतीचा धोका कमी होतो आणि शस्त्रक्रियेचे दीर्घकालीन परिणाम सुधारतात. रोबोटिक-सहाय्यक प्रक्रिया विशेषतः अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये फायदेशीर ठरतात जिथे अचूकता आणि वैयक्तिकृत काळजीचा बरे होण्यावर लक्षणीय परिणाम होतो.

"रोबोटिक शस्त्रक्रिया आम्हाला ३डी व्ह्यू देते आणि अधिक अचूकतेने शस्त्रक्रियेचे नियोजन करून ती करण्यास मदत करते" असे डॉ. धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. रुग्णाच्या पायात जुनी मेटल प्लेट असूनही, आम्ही एकाच ऑपरेशनमध्ये सुरक्षितपणे शस्त्रक्रिया करू शकलो. सर्वात उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे, एका आठवड्याच्या आत ते आपला गुडघा ९० अंशांपर्यंत वाकवू शकले आणि डिस्चार्जच्या वेळी आधाराने चालू लागले.

रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि फक्त चार दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा ते वॉकरच्या मदतीने चालत होते आणि जखमेशी संबंधित कोणतीही समस्या दिसून आली नाही. हे प्रकरण दाखवून देते की रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण जुन्या दुखापती किंवा इम्प्लांट्सचा समावेश असलेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीवर यशस्वीपणे उपचार करू शकते. जलद रिकव्हरी, कमी वेदना आणि कमी गुंतागुंत यामुळे हे तंत्रज्ञान सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये वेगाने एक 'गेम-चेंजर' बनत आहे.
 

Web Title: Robotic knee transplant is New hope for patients with old injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.