शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यात मिरची पूड टाकून लुटमार करणारी टोळी जेरबंद; पाच गुन्हयांची कबुली

By प्रदीप भाकरे | Updated: April 10, 2024 18:43 IST

अटकेमुळे मंगरूळ दस्तगिर, तळेगाव शामजीपंत, यवतमाळातील आर्णी येथील प्रत्येकी एक व बाभुळगाव पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण पाच गुन्हे उघड झाले.

 अमरावती: डोळयात मिरची पूड टाकून लुटमार करणारी चार जणांची टोळी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. १० एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. अटक चारही आरोपींकडून तीन मोटार सायकल आणि चार मोबाईल असा एकुण २ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मंगरूळ दस्तगीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या अटकेमुळे मंगरूळ दस्तगिर, तळेगाव शामजीपंत, यवतमाळातील आर्णी येथील प्रत्येकी एक व बाभुळगाव पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण पाच गुन्हे उघड झाले.             शुभम अनिलराव गोपाळे (२४ वर्ष), रितीक रामदास गोपाळे (२३, दोन्ही रा. गोकुळसरा, ता. धामणगाव रेल्वे), सागर लक्ष्मण पधारे (२३, रा. बोरगाव निस्ताने) व मंगेश सुकलाल ठाकरे (२८ वर्ष रा. पेठ रघुनाथपुर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. चौघेही धामणगाव रेल्वे तालुक्यातील आहेत. निंबोरा बोडका येथील शेषराव डोंगरे (वय ६६ वर्ष) हे ५ एप्रिल रोजी सांयकाळी मंगरूळ दस्तगीर येथून निंबोराकडे जात असताना आरोपींना ट्रिपल सिट येत त्यांच्या मोपेडला धक्का देऊन खाली पाडले. तथा त्यांच्या डोळयात मिरची पूड टाकुन चाकुचा धाक दाखवत ६० हजार रुपये जबरीने हिसकावून नेले. त्याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक सागर हटवार व नितीन चुलपार यांचे दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.लुटमार चोरीच्या दुचाकीनेआरोपींचा शोध घेत असता उपनिरिक्षक हटवार यांच्या पथकाला शुभम गोपाळे हा पुर्वी एका फायनान्समध्ये काम करीत होता, त्याची हालचाली संशयास्पद असून तो सध्या त्याच्या साथीदारासह विटाळा येथे माहिती मिळाली. त्याआधारे गोपाळेसह अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी लुटमार व मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. लुटमार करण्यासाठी प्रथम त्यांनी बाभुळगांव हद्दीतून दोन मोटार सायकल चोरल्या. त्यांनी ४ एप्रिल रोजी तळेगाव शामजीपंत हददीत फायनान्सचे कर्मचाऱ्याच्या डोळयात मिरची पुड टाकून त्याला दिड लाखांनी लुटले. दुसऱ्या दिवशी मंगरूळ दस्तगीर हददीत शेषराव डोंगरे यांना लुटले.यांनी केली कामगिरीपोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षकद्वय सागर हटवार व नितीन चुलपार, मुलचंद भांबुरकर, अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, भुषण पेठे, रविंद्र बावणे, सचिन मसांगे, पंकज फाटे तसेच पो.स्टे. सायबर येथील अंमलदार सागर धापड, चेतन गुन्हाने, रितेश वानखडे, सारिका चौधरी, संजय प्रधान, निलेश येते ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीPoliceपोलिस