चाकूच्या धाकावर युवकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:17 IST2021-08-28T04:17:11+5:302021-08-28T04:17:11+5:30

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू आसेगाव पूर्णा : यावली शहीद येथे दुचाकी नाल्यात उलटल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना २५ ऑगस्टच्या ...

Robbed the youth with a knife | चाकूच्या धाकावर युवकाला लुटले

चाकूच्या धाकावर युवकाला लुटले

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

आसेगाव पूर्णा : यावली शहीद येथे दुचाकी नाल्यात उलटल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना २५ ऑगस्टच्या रात्री घडली. अंत्यविधी आटपून दुचाकी क्रमांक एमएच बीए ८६४१ ही नाल्यात कोसळली. यात बजरंग नामदेवराव भोंगळ यांचा मृत्यू झाला असून प्रकाश रूपराव अंभोरे हा उपचारादरम्यान दगावला. अपघातात अंत्यविधी आटपून घरी परत येताना अपघात घडला. मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून वरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

--------------------

लोणी येथून ट्रॅक्टर-ट्राॅली लंपास

लोणी : येथून पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७ एल ७८८१ व ट्राॅली क्रमांक एमएच जे ४२०४ अज्ञाताने चोरून नेल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी घडली. अब्दूल रफीक शेख (६१, रा. लोणी टाकळी) यांच्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------------

मद्यपीची महिलेला विटेने मारहाण

खोलापूर : दारू पिऊन घरातील साहित्य फेकल्यावरून हटकले असता, महिलेला शिवीगाळ करून विटेने मारून जखमी केल्याची घटना वाठोडा शुक्लेश्वर येथे २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. तक्रारीवरून खोलापूर पोलिसांनी आरोपी सोमेश्वर रवींद्र खोपे (३०, रा. वाठोडा)विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------

काळगव्हाण शिवारातून दुचाकी लंपास

वनोजा बाग : रहिमापूर पोलीस ठाण्यांतर्गत काळगव्हाण शिवारातून एमएच ३० टी ३९७९ क्रमांकाची दुचाकी लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी घडली. नंदकिशोर प्रल्हादराव कोरडे (५०, रा. काळगव्हाण) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Robbed the youth with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.