शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाला लुबाडले; तोतयाला खऱ्या पोलिसांनी अर्ध्या तासात पकडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 18:17 IST

आजम खान अफजल खान पठाण (५८, रा. मलकापूर पांगरा, बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे.

अमरावती : पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्धाला २५ हजार रुपयांनी गंडविणाऱ्या तोतयाला कोतवाली पोलिसांनी अवघ्या अध्या तासात पकडून कोठडीत टाकले. तोतयेगिरीची ती घटना २४ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील इतवारा बाजार परिसरात घडली. घटनेनंतर त्वरेन अटक करण्यात आलेल्या त्या तोतयाकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आजम खान अफजल खान पठाण (५८, रा. मलकापूर पांगरा, बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे.

तक्रारीनुसार, रामगाव येथील रहिवासी ताराचंद श्यामराव पाचपोर (६४) यांनी वलगाव येथून एका बँकेतून २५ हजार रुपये काढले. त्यानंतर ते ऑटोने अमरावती शहरातील चित्रा चौकात आले. तेथून ते पायदळ इतवारा बाजारकडे जात होते. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आजम खानने त्यांना अडविले. आपण पोलीस असून या भागात तपासणी सुरू असल्याची बतावणी त्याने केली. त्याने ताराचंद यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला नेले. त्याचवेळी त्याने तपासणीच्या नावावर हातचलाखी करून ताराचंद पाचपोर यांच्या खिशातून २५ हजारांची रोकड लांबविली. त्यानंतर त्याने ताराचंद यांना सोडून दिले. थोड्यावेळाने खिशातील रोकड लंपास झाल्याचे लक्षात आल्यावर ताराचंद यांना त्या तोतयावर संशय आला. त्यामुळे त्यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली.

अंबादेवी रोडवरील लॉजमध्ये मुक्कामतक्रारीवरून शहर कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी तातडीने तपासचक्रे फिरवित एका तासाच्या आत सरोज चौक येथून तोतया आजम खानला अटक केली. त्याच्याकडून १० हजारांची रोकड देखील जप्त करण्यात आली. आजम खान हा गेल्या काही दिवसांपासून शहरातील एका लॉजमध्ये मुक्कामी आहे. त्यामुळे त्याने शहरात आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश सपकाळ, दीपक श्रीवास, मोहम्मद समीर, मंगेश दिवेकर, सागर ठाकरे यांनी केली.

तीन आठवड्यात चार घटनागाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील पंचवटी चौक परिसरात शंकर उदयभान सोनोने (७०, रा. यशोदानगर) यांना पोलीस असल्याची बतावणी करून तोतयाने ९ हजार रुपयांनी गंडविले होते. ही घटना २२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली होती. हा गुन्हासुद्धा आजम खानने केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यापुर्वी, २७ डिसेंबर २०२३ रोजी पीडीएमसीसमोर एका ६८ वर्षीय वृद्धाकडून हातचलाखीने १५ हजार रुपये लुटण्यात आले होते. त्यानंतर २८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी देखील तोतया पोलिसाने वरूडा येथील वृध्दाकडून १० हजार रुपये हातचलाखीने नेले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती