रोडरोलर, दूरदर्शन संच, कपबशीला राहणार पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST2021-01-04T04:11:19+5:302021-01-04T04:11:19+5:30

धामणगाव रेल्वे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना ४ जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह मिळणार असून गटाप्रमाणे यंदाही रोडरोलर, ...

Roadrollers, television sets, pumpkins will be preferred | रोडरोलर, दूरदर्शन संच, कपबशीला राहणार पसंती

रोडरोलर, दूरदर्शन संच, कपबशीला राहणार पसंती

धामणगाव रेल्वे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना ४ जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह मिळणार असून गटाप्रमाणे यंदाही रोडरोलर, दूरदर्शन संच, कपबशी व नगारा या चिन्हाला पहिली पसंती राहणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सोमवारी दुपारी ३ वाजतानंतर ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या उमेदवारांना चिन्हवाटप होणार आहे.

शासनाच्या १८ जानेवारी २०१७ च्या राजपत्राप्रमाणे प्रभाग पद्धतीनुसार प्रत्येक उमेदवारांना हे मुक्त चिन्ह मिळणार आहे. यात कपाट, ब्रश, डिझेल पंप, इस्त्री, करवत, तंबू, फुगा, केक, विजेचा खांब, जग, कात्री, व्हाओलिन, टोपली, कॅमेरा, काटा, किटली, शिवणयंत्र, चालण्याची काठी, बॅट, मेणबत्ती, कढई, शटल, शिट्टी, छताचा पंखा, फलंदाज, गॅस, सिलिंडर, पत्रपेटी, पाटी, बॅटरी, टॉर्च, कोट, काचेचा पेला, मका, स्टूल, फळा, हार्मोनियम, नारळ, नगारा, टेबल, पाव, कंगवा, हॅट, अंगठी, टेबल लॅम्प, ब्रिफकेस, आईस्क्रीम या मुक्त चिन्हांतून उमेदवारांना एक चिन्ह निवडता येणार आहे. प्रभाग पद्धतीनुसार एका गटाच्या उमेदवाराला एकच चिन्ह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागता येणार आहे.

------------------------------

Web Title: Roadrollers, television sets, pumpkins will be preferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.