गतिरोधकाविना रस्ता ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:01:30+5:30

काही दिवसांपूर्वी येथील कापड व्यावसायिक नितीन गावंडे यांनी, तर नुकतेच तहसील कार्यालयासमोर झालेल्या अपघातामध्ये गभणे कुटुंबातील दोघांनी प्राण गमावले, शिवाय तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी वयोवृद्ध वडिलांना घरी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. मुख्य रस्त्यावर योग्य तºहेने व ठिक-ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे असे अनेक अपघात घडले आहेत.

A road without a traffic jam is fatal | गतिरोधकाविना रस्ता ठरतोय जीवघेणा

गतिरोधकाविना रस्ता ठरतोय जीवघेणा

Next
ठळक मुद्देअनेक अपघात : शहरवासीयांमध्ये असंतोष, मुख्य मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : शहरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मुख्य महामार्गावर गतिरोधक लावण्याची मागणी समोर आली आहे. अमरावती ते पांढुर्णा महामार्ग झाल्यापासून मोर्शी शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत अनेक संघटनांनी निवेदन देऊनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मोर्शीकर करीत आहेत.
कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यास सप्टेंबरमध्ये शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे निश्चितच रस्त्यावरील रहदारी व गर्दीचे प्रमाण वाढणार आहे. गतिरोधक नसल्याने भरधाव वेगाने वाहणाºया वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी येथील कापड व्यावसायिक नितीन गावंडे यांनी, तर नुकतेच तहसील कार्यालयासमोर झालेल्या अपघातामध्ये गभणे कुटुंबातील दोघांनी प्राण गमावले, शिवाय तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी वयोवृद्ध वडिलांना घरी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. मुख्य रस्त्यावर योग्य तºहेने व ठिक-ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे असे अनेक अपघात घडले आहेत. या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बनविण्यात यावे. वाहनांची गती नियंत्रणात आणण्यासाठी या उपाययोजना आवश्यक आहेत. त्यामुळे यावर तातडीने अंमल व्हावा, असे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

जीव जाण्यापूर्वी लावा
यापुढे अपघातामुळे कोणाचे जीव जाण्याअगोदर मुख्य महामार्गावर, मुख्य चौक, रहदारी व गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. भाजयुमो, भाजप शहराध्यक्ष रवी मेटकर, तालुकाध्यक्ष अजिंक्य लुंगे, निखिल टेकाडे, शहराध्यक्ष आकाश ढोमणे, सरचिटणीस मनीष इंगळे, गौरव आखरे व चेतन घाटोळे, बलराम द्विवेदी, लकी पुरोहित, राहुल पंडागरे, अजय धुर्वे, रोशन गिद, सचिन गोमकाळे उपस्थित होते.

Web Title: A road without a traffic jam is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.