रस्ता चौपदरीकरणासाठी तोडलेली वृक्षे ठरत आहे जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:25 IST2018-09-28T22:24:45+5:302018-09-28T22:25:01+5:30
अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी एक महिन्यापूर्वी तोडण्यात आलेले वृक्ष अजूनपर्यंत तेथेच पडून आहे. रात्री अंधारात हे वृक्ष वाहनचालकांना एकाएकी दिसत नसल्याने धोक्याचे ठरत आहे. तात्काळ हटविण्याची मागणी पुढे आली आहे. संबंधित यंत्रणेने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

रस्ता चौपदरीकरणासाठी तोडलेली वृक्षे ठरत आहे जीवघेणी
श्यामकांत सहस्त्रभोजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी एक महिन्यापूर्वी तोडण्यात आलेले वृक्ष अजूनपर्यंत तेथेच पडून आहे. रात्री अंधारात हे वृक्ष वाहनचालकांना एकाएकी दिसत नसल्याने धोक्याचे ठरत आहे. तात्काळ हटविण्याची मागणी पुढे आली आहे. संबंधित यंत्रणेने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नरखेड रेल्वे उड्डाणपुलापासून ते बडनेरा रेल्वे स्टेशनजवळून गेलेल्या महामार्गावरील उड्डाणपुलापर्यंतचे वृक्ष चौपदरीकरणाच्या कामासाठी तब्बल एक महिन्यापूर्वी तोडण्यात आले. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यालगतच पडून असणाऱ्या वृक्षांमुळे बºयाच वाहनचालकांवर पडण्याची वेळ येत आहे. या मार्गावरून जाणाºया वाहनचालकांमध्ये याप्रती संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. वृक्ष असेच तोडून ठेवायचे होते, तर कटाईची घाई का केली, असेही बोलले जात आहे. हे तोडलेले वृक्ष येथून तात्काळ हटवावे, असे बडनेरा वासियांसह वाहन चालकांमध्ये बोलल्या जात आहे. यंत्रणा सदर कंत्राटदाराला अभय देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
तब्बल तीन किलोमीटरपर्यंतच्या अंतराची वृक्षकटाई करण्यात आली आहे. रस्त्यालगत पडलेले वृक्ष व खराब रस्त्यांमुळे एवढ्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ज्या भागात वृक्षकटाई करण्यात आली, तेथे पुरेशी प्रकाश व्यवस्थादेखील नाही. याचा सारासार विचार प्रशासनाने करावा, अशी मागणी नागरिकांमधूून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्ष कापण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिला, त्याने निर्धारित वेळेत कापलेले लाकूड उचलून नेऊन त्याची विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे. मात्र, महिन्याचा कालावधी लोटूनही रस्त्याच्या दुतर्फा अपघातास कारणीभूत ठरणारे हे भले मोठे ओंडके जागोजागी आहे. याशिवाय या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आता या रस्त्याच्या दुरुस्तीची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.
अमरावती मार्गावर तोडण्यात आलेली झाडे रस्त्यालगत तशीच पडून आहे. ती धोक्याची ठरत आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी व तात्काळ रस्त्यालगत पडून असणारी झाडे हटवावीत.
- नितीन मांजरे
सामाजिक कार्यकर्ते, बडनेरा.