टेंभूरखेड्याचा रस्ता नादुरुस्त, आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:12 IST2021-03-21T04:12:46+5:302021-03-21T04:12:46+5:30
टेंभूरखेडा : येथील काँक्रीट रस्त्याचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्यावतीने सार्वजनिक ...

टेंभूरखेड्याचा रस्ता नादुरुस्त, आंदोलनाचा इशारा
टेंभूरखेडा : येथील काँक्रीट रस्त्याचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याना देण्यात आला आहे. टेंभुरखेडा येथील गावठाणापासून ते गव्हाणकुंड रस्त्यापर्यंत काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. परंतु, जिल्हा परिषद शाळेपासून पुढे काम बंद आहे. अपूर्ण बांधकामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे तसेच वाहनांनासुद्धा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचा रोष गावपातळीवर ग्रामपंचायतवर आहे. ते लक्षात घेता, त्वरित अपूर्ण रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावी, अन्यथा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच रोशनी निंभोरकर, उपसरपंच राजेंद्र सोनुले, ग्रामविकास अधिकारी सतीश देशमुख व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.
--------------