मुख्य रस्त्यासाठी नांदगांवात चक्काजाम

By Admin | Updated: July 22, 2016 00:07 IST2016-07-22T00:07:24+5:302016-07-22T00:07:24+5:30

तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा अंतर्गत शहरातील रखडलेल्या मुख्य रस्त्यांसाठी नांदगांववासी आक्रमक झाले.

Road to Nandgaon for main road | मुख्य रस्त्यासाठी नांदगांवात चक्काजाम

मुख्य रस्त्यासाठी नांदगांवात चक्काजाम

नागरिक आक्रमक : बाजारपेठ बंद, शासनाविरोधात नारेबाजी
नांदगांव खंडेश्वर : तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा अंतर्गत शहरातील रखडलेल्या मुख्य रस्त्यांसाठी नांदगांववासी आक्रमक झाले. गुुरुवारी आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी शासन व लोकप्रतिनिधींविरोधात नारेबाजी करण्यात आली.
शहरातील मुख्य रस्त्याच्या रखडेलेल्या कामकाजामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत शहरातील राजकीय नेत्यांनी आंदोलन समिती स्थापन करुन प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. परंतु प्रशासन डोळेझाकपणा करीत असल्याने आंदोलन समिती व इतर कार्यकर्त्यांनी गुरुवारी रास्तारोको केले. यामध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. गावातील बाजारपेठ बंद होती. यावेळी आंदोलनकर्त्यांची आक्रमकता लक्षात घेता नांदगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमित वानखडे यांनी व्यापक बंदोबस्त लावला. आंदोलनामध्ये आंदोलन समितीचे प्रकाश मारोटकर, राजेश पाठक, संजय पोपळे, ज्ञानेश्वर शिंदे, शिवाजी मेश्राम, धनराज रावेकर, राजेश जाधव, न्यायमन खाँ, सय्यद अनवर, प्रभाकर शिंदे, अरुण शिंदे, गुणवंत चांदुरकर, मो. साजिद, सागर सोनोने,ब्रह्मानंद शामसुंदर, अभय बनारसे आदी आंदोलनात सहभागी झाले. यावेळी सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)

 

Web Title: Road to Nandgaon for main road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.