दळणवळणासाठी जीवनवाहिनी असलेला रस्ता रखडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST2021-04-07T04:13:02+5:302021-04-07T04:13:02+5:30
फोटो पी ०६ चेचरवाडी पान ३ ची बॉटम भातकुली : तालुक्यातील उत्तरेकडील अनेक गावांना भातकुली शहराशी जोडणाऱ्या चेचरवाडी-धामोरी या ...

दळणवळणासाठी जीवनवाहिनी असलेला रस्ता रखडला!
फोटो पी ०६ चेचरवाडी
पान ३ ची बॉटम
भातकुली : तालुक्यातील उत्तरेकडील अनेक गावांना भातकुली शहराशी जोडणाऱ्या चेचरवाडी-धामोरी या अतिशय महत्त्वाच्या रस्त्याचे काम भातकुलीजवळ रखडल्याने या रस्ता निर्मितीच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. तालुक्यातील लोकांची जीवनवाहिनी असलेल्या या अतिमहत्त्वाच्या रस्त्याच्या कामाकडे आता शासन-प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
भातकुली शहराच्या उत्तरेकडील अनेक गावांना दळणवळणाच्या दृष्टीने धामोरी ते भातकुली हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. सुमारे पन्नास टक्के गावांतील लोक या मार्गावरून ये-जा करू शकतात. या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात डांबरीकरणाचे काम झाले आहे. मात्र, भातकुलीजवळ सुमारे एक किलोमीटर टप्प्याचे काम रखडल्याने या रस्त्याच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता शेतकरी, तालुक्यातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
पावसाळ्यात मोठी कसरत
भातकुली शहरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती या मार्गावर आहे. पावसाळ्यात रखडलेल्या एक किलोमीटर रस्त्यावर खूपच चिखल होत असल्याने शेतकऱ्यांना आपला माल १५ ते २० किमी फेरा करून हरताळा मार्गे आणावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोच, अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता
भातकुली तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतर झाल्याने तालुक्यातील उत्तरेकडील बहुतांश गावातील लोकांना भातकुली येथील विविध कार्यालयांत कामाकरिता येण्यासाठी हा अगदी शॉर्टकट मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित करून नागरिकांसाठी दळणवळणाची सोय करण्याची अत्यंत गरज आहे.
शासन, प्रशासनाने घ्यावी दखल
भातकुली ते धामोरी रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, भातकुली गावाजवळ एक किलोमीटर रस्त्याचे काम रखडले आहे. हा रस्ता तालुक्यातील लोकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे यासंदर्भात आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी, विद्यार्थ्यांसह नागरिकांत व्यक्त केली जात आहे.