करजगावातील रस्ता १५ दिवसांत फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:27+5:302021-03-23T04:14:27+5:30
करगगाव : येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४ मधील जेबी प्लॉटमध्ये ग्रामपंचायतीने १४ वा वित्त ...

करजगावातील रस्ता १५ दिवसांत फुटला
करगगाव : येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४ मधील जेबी प्लॉटमध्ये ग्रामपंचायतीने १४ वा वित्त आयोगाच्या निधीतून २ लाख ५० हजार रुपये खर्चून रस्ता बांधण्यात आला. मात्र, रस्ता निर्माण होऊन १५ दिवसच झाले. रस्त्यावर वाहतूकही नीट सुरू झाली नाही, तोच हा रस्ता १५ दिवसांत फुटला. त्यामुळे रस्ता बांधकामावर शंका उपस्थित केली जात आहे.
या रस्ता बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला. तसेच रस्त्याच्या कडेला सार्वजनिक पाणीपुरवठा करणार नळ असतानादेखील रस्त्यावर पाणी टाकण्यात आले नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना चांदूरबाजार तालुक्यातील या ग्रामपंचायतच्या अखत्यारितील रस्त्याचे बांधकाम चव्हाट्यावर आले. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांचे सलोख्याचे कमिशनखोरीचे संबंध कारणीभूत असल्याचे नागरिक बोलत आहे.
-------------------