रस्ता चौपदरीकरण, केबलिंग एकाचवेळी

By Admin | Updated: March 23, 2015 00:25 IST2015-03-23T00:25:36+5:302015-03-23T00:25:36+5:30

बडनेऱ्यातील पोलीस ठाणे ते टी-पॉर्इंटपर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरण व वीज वितरण कंपनीचे केबलिंगचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

Road four-way, cabling simultaneously | रस्ता चौपदरीकरण, केबलिंग एकाचवेळी

रस्ता चौपदरीकरण, केबलिंग एकाचवेळी

लोकमत विशेष
श्यामकांत सहस्त्रभोजने  अमरावती
बडनेऱ्यातील पोलीस ठाणे ते टी-पॉर्इंटपर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरण व वीज वितरण कंपनीचे केबलिंगचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. हा मार्ग वर्दळीचा असल्याने कामाला गती देण्याची मागणी पुढे येत आहे.
मागील दोन महिन्यांपासून नव्यावस्तीतून जाणाऱ्या महामार्गावर पोलीस ठाण्यापासून ते यवतमाळ टी-पॉर्इंटपर्यंतच्या अर्धा किलोमीटर अंतराच्या चौपदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. अकोला, यवतमाळकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. दरम्यान एवढ्याच भागात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. बसस्थानकदेखील याच मार्गावर आहे. खासगी वाहन पार्किंग याच परिसरात होत असल्यामुळे याठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. दोन महिन्यांपासून या मार्गावर दुभाजक बसविण्याचे काम सुरू आहे. या दुभाजकांमुळे दोनही बाजूने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीचे केबल काढण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता बराच मोठा रस्ता खोदण्यात आला आहे. ही सर्व कामे संथगतीने सुरू आहेत. एकाचवेळी केबलिंगचे काम व चौपदीकरणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ही दोन्ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारे केली जात असल्याची माहिती आहे. या मार्गावरील सततच्या वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर दुभाजक लावल्यामुळे वाहतुकीला खोळंबा होत असल्याची ओरड वाहनचालकांची आहे.
अपघाताचा धोका वाढला
पोलीस ठाणे ते यवतमाळ टी-पॉर्इंटपर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्याचप्रमाणे याचवेळी वीज वितरण कंपनीचे केबल काढण्याचे कामही सुरू आहे. या दोनही कामांमुळे या भागात अपघातांचा धोका वाढला आहे. नियोजनचा अभाव असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. कामात नियोजन आणून कामाला गती देण्याची मागणी नागरिकांमध्ये होत आहे. अशाच पध्दतीने कामकाज सूरू राहिल्यास मोठा अपघात घडू शकतो.

Web Title: Road four-way, cabling simultaneously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.