श्रेयवादात रखडले रस्ता बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST2020-12-16T04:29:23+5:302020-12-16T04:29:23+5:30
आझाद चौकातील रखडलेल्या रस्त्याचे बांधकाम केव्हा होणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेने आता या रस्त्याच्या बांधकामाची ...

श्रेयवादात रखडले रस्ता बांधकाम
आझाद चौकातील रखडलेल्या रस्त्याचे बांधकाम केव्हा होणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेने आता या रस्त्याच्या बांधकामाची जबाबदारी झटकली आहे. आता हा रस्ता ग्रामपंचायत पूर्ण करेल, अशी माहिती जिल्हा परिषदमार्फत देण्यात आली, तर ग्रामपंचायतने अद्याप रस्ता बांधकामाला सुरुवात केलेली नाही. चौकाचे काम कधी पूर्ण होणार, हे अनुत्तरित आहे. आझाद चौकातील रस्ता बांधकाम व सौंदर्यीकरण ग्रामपंचायत निधीतून पूर्ण करण्यात येणार आहे. सचिवांच्या तोंडी सांगण्यावरून चौकातील काम करण्यात आलेले नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता नीला वंजारी यांनी दिली. या चौकातील रस्ताकामाचे कार्यारंभ आदेश निघाल्याचा दावा करजगाव येथील ग्रामसेवक किशोर उल्हे यांनी केला.