इंधन दरवाढीविरोधात म्हैसपूर फाट्यावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:02+5:302021-07-09T04:10:02+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; तासभर वाहतूक ठप्प अमरावती : गत काही महिन्यांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या दराने तर ...

इंधन दरवाढीविरोधात म्हैसपूर फाट्यावर रास्ता रोको
राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; तासभर वाहतूक ठप्प
अमरावती : गत काही महिन्यांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या दराने तर शंभरी पार केली आहे. डिझेलचा शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईविरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दर्यापूर मार्गावरील म्हैसपूर फाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्षा संगीता ठाकरे यांचे नेतृत्वात मोदी सरकारविरोधात जोरदार नारेबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे जवळपास तासभर वाहतूक ठप्प झाली होती. दिली.
केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणांमुळे मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर चांगलेच वाढले आहेत. वाढती महागाई ही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे मोदी सरकारविरोधात रोष वाढत आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हा महिला अध्यक्षा संगीता ठाकरे, झेडपीचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे, अजित पटेल, अनिल ठाकरे, राजेश बर्वे, तालुका महिला अध्यक्ष सरला इंगळे, तालुका अध्यक्ष नसीम पठाण, रवी बुरघाटे, शहीद भाई, पुष्कर निमकर, बाबाराव महात्मे, राजुभाऊ बोडखे, रशीदभाई शकील अहमद शकील अन्सारी, दीपक जवंजाळ, जावेद खान, रामदास थोरात, कुणाल केवतकर व परिसरातील शेतकरी व शेतमजूर ट्रॅक्टर व नांगरटी घेऊन सहभागी झाले होते.