रस्त्यावरील चुरीमुळे होऊ शकतो अपघात
By Admin | Updated: July 23, 2016 00:37 IST2016-07-23T00:37:49+5:302016-07-23T00:37:49+5:30
अमरावती शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला बारीक चुरी (रेती) झाल्यामुळे दुचाकी वाहन स्लिप होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यावरील चुरीमुळे होऊ शकतो अपघात
जीवघेणे रस्ते : बांधकाम विभाग, महापालिकेचे दुर्लक्ष
अमरावती : अमरावती शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला बारीक चुरी (रेती) झाल्यामुळे दुचाकी वाहन स्लिप होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू या बाबाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महापालिकेचे दुर्लक्ष आहे.
शहरातील अनेक रस्ते उखडले आहेत. पंचवटी चोक ते अमरावती आगारा कडे जाणारा मार्ग हा राज्य महामार्ग आहे. परंतु हा रस्ता उखळल्यामुळे रस्त्यावर येथे बारीक रेतीची चुरी निर्माण झाली आहे. ही चुरी रस्त्याच्या दोन्ही कळेला साचली आहे. त्यामुळे भरधाव चालविणाऱ्या दुचाकी वाहन स्लिप होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच परिस्थिती इर्विन रुग्णालयापासून पंचवटी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कायम आहे. या रस्त्यावरच्या बारीक चुरीमुळी हे धुळकण नागरिकांच्या डोळयात उडत आहेत. या कारणाने शहरातील नागरिका हैराण झाले असून यावर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण होत आहे. अमरावती शहराची स्मार्ट सिटी कडे वाटचाल सुरू आहे. परंतु शहरातील रस्ते उखळल्यामुळे त्या रस्त्याच्या कडेला बारीक चुरीे पडली आहे. त्यामुळे अनेक दुचाकी चालकांना, महिलांना व विद्यार्थ्यांना या धुळकणीचा रोज सामना करावा लागतो. याकडे प्रदूषण नियंत्रण विभागाचेही दुर्लक्ष आहे. कारण अमरावती शहराचे प्रदूषण रोज वाढतच आहे. शहरात मोठयाप्रमाणात धुळकण असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. डोळयात धूळ जात असल्यामुळे डोळयाचे आजारही वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगर पालिकाच्या बांधकाम विभागाने संयुक्तीरीत्या दखल घेऊन त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील धुळकण स्वच्छ करावी. व उखळलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)