अतिउष्णतेमुळे संत्रा फळांच्या गळतीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 05:00 AM2021-04-09T05:00:00+5:302021-04-09T05:00:58+5:30

तालुक्यात ८२० हेक्टर संत्रा फळबाग आहे. आंबिया बहराची आवळ्याच्या आकाराची फळे झाडावर आहेत.  हवामानात बदल होऊन उष्णतामान वाढल्याने संत्रा फळे गळत आहे.  या शेतकऱ्यानी हवामानावर आधारित पीक विमा काढला आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम फळे व पिकांवर होत असून, संत्रा बागायतदार हवालदिल झाले आहेत. या बदलामुळे आंब्याचा मोहोर व फळांची गळती होत आहे.

Risk of leakage of orange fruit due to overheating | अतिउष्णतेमुळे संत्रा फळांच्या गळतीचा धोका

अतिउष्णतेमुळे संत्रा फळांच्या गळतीचा धोका

Next
ठळक मुद्देनांदगाव खंडेश्वरमधील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : संत्राबागेतील आंबिया बहराची फळे अतिउष्णतेमुळे गळत आहे. १५ दिवसांपूर्वी तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे उष्णतामान कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता. पण, आता एकाएकी उष्णतामान वाढल्याने हवामानातील या बदलातील परिणामामुळे संत्रा झाडावरील फळे गळत आहे.
तालुक्यात ८२० हेक्टर संत्रा फळबाग आहे. आंबिया बहराची आवळ्याच्या आकाराची फळे झाडावर आहेत.  हवामानात बदल होऊन उष्णतामान वाढल्याने संत्रा फळे गळत आहे.  या शेतकऱ्यानी हवामानावर आधारित पीक विमा काढला आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम फळे व पिकांवर होत असून, संत्रा बागायतदार हवालदिल झाले आहेत. या बदलामुळे आंब्याचा मोहोर व फळांची गळती होत आहे. या वातावरणामुळे खरबूज व टरबुजावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. बदलते हवामान भाजीपाला, फळे व पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. विदर्भात सध्या गहू व हरभरा पिकांची काढणी सुरू आहे. जवळपास ७० टक्के काढणी झाली आहे. उर्वरित ३० टक्के पिकाला याचा फटका बसत आहे. शासनाने या शेतकऱ्यांचा विचार करण्याची मागणी होत आहे.

येणस येथील शिवारात पाच एकर संत्राबाग आहे. त्यावर आवळ्याच्या आकाराची आंबिया बहराची संत्री फळे आहे. अतिउष्ण तापमानामुळे झाडावरची फळे गळत आहे. जवळपास झाडावरील अर्धा फळांचा माल गळाला. तालुक्यातील संत्राबागांतील जवळपास हीच परिस्थिती आहे.
- मनोज कडू, शेतकरी, येनस

 

Web Title: Risk of leakage of orange fruit due to overheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती