Rising seed prices will offset onion losses! | बियाण्याच्या दरात वाढ कांदा नुकसान भरून काढणार!

बियाण्याच्या दरात वाढ कांदा नुकसान भरून काढणार!

ठळक मुद्देपायलीला ३००० रुपये : एकीकडे कांद्याची दरवाढ, दुसरीकडे बियाणे महागले

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगावसुर्जी : एकीकडे कांद्याच्या दरवाढीने गृहिणी हवालदिल झाल्या आहेत, तर दुसरीकडे पांढऱ्या कांद्याचे बियाणे (घोपाट) दरात विक्रमी वाढ झाल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. हे बियाणे प्रतिकिलो १,२५० ते १,५०० रुपये आणि एक पायली बियाणे ३ हजार रुपये दराने विक्री होत आहे. भावातील तेजीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
सर्वसाधारणपणे पथ्रोट, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरातील शेतकरी हे पूर्वीपासून पांढरा कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. घोपाट फुलातून बी गोळा करणे, एप्रिल ते सप्टेंबर या काळात साठवण ही जिकरीची कामे आहेत. त्यामुळे या भागातील ठरावीकच शेतकरी कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. गतवर्षी कांद्याचे दर गगनाला भिडल्याने व बियांचा कांदा न मिळाल्याने घोपाटाची कमी प्रमाणात लागवड झाली. लागवड झालेल्या घोपाटाच्या फुलांचे यावर्षी परागीकरण न झाल्याने कांदा बियाण्यांचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे कांदा बियाण्याच्या दरात यंदा विक्रमी वाढ झाली.
अतिवृृृृष्टीमुळे विहिरी व कूपनलिकेतून सिंचनाकरिता पाणी हमखास मिळण्याची खात्री कांदा उत्पादकांना आहे. याशिवाय खरिपाची मूग, उडीद, सोयाबीन ही पिके हातची गेल्याने रबी कांदा लागवडीकडे बागायतदार शेतकºयांचा कल दिसत आहे.
सद्यस्थितीत कृषिसेवा केंद्रांवर खासगी कंपनीचे पांढºया कांद्याचे ५०० ग्रॅम बियाणे ६००, तर लाल कांद्याचे बियाणे ५५० रुपयांच्या आसपास आहे. परंतु, या बियाण्यांबाबत दुकानदारच खात्री देत नाहीत. बियाणे खरेदीबाबत सावध राहावे, असा सल्ला जाणकार शेतकºयांनी दिला आहे.

बियाणे खरेदीची लगबग
साधारणत: सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते अष्टमीपर्यंत रोवणीचा काळ असल्याने सर्व शेतकºयांनी कांदा बियाणे खरेदी सुरू केली आहे. शेतकरी कंपन्यांऐवजी इतर शेतकºयांकडील खात्रीशीर बियाण्यांवर विश्वास ठेवतात. कारण बियाणे न उगवल्यास विक्रेता शेतकरी प्रसंगी पैसेही परत करतो. यंदा चणा, गहू, सूर्यफूल, करडई, जवस, वाटाणा, तीळ या रबी पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोबत बियाणे दरवाढीची भीती व्यक्त होत आहे.

यंदा अतिवृृृष्टी झाल्याने ओलिताकरिता मुबलक पाणी उपलब्ध आहे. याशिवाय कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयांचा लागवडीकडे कल आहे.
- संजय नाठे,
शेतकरी, अंजनगाव सुर्जी

Web Title: Rising seed prices will offset onion losses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.