नालंदा विद्यापीठाचे कुलपतींच्या हस्ते ऋचा अचिंतलवार सन्मानित

By Admin | Updated: February 27, 2017 00:18 IST2017-02-27T00:18:24+5:302017-02-27T00:18:24+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश तसेच नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रवेशात...

Richa Achintlwar honored by the Chancellors of Nalanda University | नालंदा विद्यापीठाचे कुलपतींच्या हस्ते ऋचा अचिंतलवार सन्मानित

नालंदा विद्यापीठाचे कुलपतींच्या हस्ते ऋचा अचिंतलवार सन्मानित

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश तसेच नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रवेशात इयत्ता १२ उत्तीर्ण व आयु:शल्य विज्ञान स्नातक भाग १ ला प्रवेशित सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल ऋचा जितेंद्र अचिंतलवार हिला नालंदा विद्यापीठाचे कुलपती विजय भटकर यांच्या हस्ते रामकृष्ण गोंविद मोटे रोख पारितोषिकांने सन्मानित करण्यात आले आहे.
ऋचा ही येथील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. विद्यासागर राव तर प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. ऋचा ही अमरावती विद्यापीठातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी टॉपर ठरली आहे. ऋचा ही आपल्या यशाचे श्रेय गुरुजन, आई, वडिलांना देते. (प्रतिनिधी)

Web Title: Richa Achintlwar honored by the Chancellors of Nalanda University