क्रांतिकारकांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी
By Admin | Updated: August 10, 2016 00:02 IST2016-08-10T00:02:07+5:302016-08-10T00:02:07+5:30
देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारांच्या कार्याची प्रेरणा प्रत्येक युवकांनी अंगिकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.

क्रांतिकारकांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी
बबलू देशमुख : जिल्हा काँग्रेसतर्फे क्रांती दिन
अमरावती : देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारांच्या कार्याची प्रेरणा प्रत्येक युवकांनी अंगिकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.
जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या वतीने आयोजित क्रांतिदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ते म्हणाले, प्राणाची आहुती देऊन ज्या क्रांतीविरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे त्यांचे विचार सर्वानाच सर्दैव प्रेरणादायीच आहेत. यावेळी महात्मा गांधी व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन बबलू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री यशवंतराव शेरेकर, विद्या देडू, सतीश उईके, श्रीराम नेहर, छाया दंडाळे, संजय मापले, प्रल्हाद ठाकरे, उषा उताणे, संजय वानखडे, जयंत देशमुख, बापुराव गायकवाड, बच्चू बोबडे, भागवत खांडे, सतीश धोंडे, बिटू मंगरोळे, सुभाष पाथरे, दिलीप तायडे, मुजफ्फर मामू, साजीद शहजाद पठाण, समिर जवंजाळ, राजा बांगडे, विनोद धुंडीयाल पंकज मोरे, विठ्ठल सरडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)