जिल्हा परिषदेचे २७ कोटींचे सुधारित, तर २२.८८ लाखाचा अर्थसंकल्प

By जितेंद्र दखने | Published: March 15, 2024 10:06 PM2024-03-15T22:06:39+5:302024-03-15T22:07:14+5:30

सीईओ तथा प्रशासक संजीता मोहपात्रा यांच्याकडून शिक्कामोर्तब

Revised budget of Zilla Parishad is 27 crores | जिल्हा परिषदेचे २७ कोटींचे सुधारित, तर २२.८८ लाखाचा अर्थसंकल्प

जिल्हा परिषदेचे २७ कोटींचे सुधारित, तर २२.८८ लाखाचा अर्थसंकल्प

अमरावती: जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा सन २०२३-२४ चा २७ कोटी ६८ हजार ३० हजार ७५५ सुधारित, तर सन २०२४-२५ चा २२ कोटी २४ लाख २८ हजार ७०० रुपयांच्या मूळ अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजीता मोहपात्रा यांनी १५ मार्च रोजी खातेप्रमुखांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत सादर केला. यंदाच्या बजेटमध्ये शिक्षण,कृषी सुविधांवर भर देण्यात आला आहे.

जि.प.डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेच्या अध्यक्षस्थानी सीईओ संजीता मोहपात्रा होत्या. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, अतिरिक्त सीईओ संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, श्रीराम कुलकर्णी, डॉ. कैलास घोडके, बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, पाणीपुरवठ्याचे सुनील जाधव, डीएचओ डॉ. सुरेश आसोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विनी मारणे, उपअभियंता राजेश लाहोरे, आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रशासकांनी अर्थसंकल्पाचे अनुषंगाने मनोगत व्यक्त केले.

सभेत झेडपीच्या सन २०२३-२४ च्या सुधारित २७ कोटी ६८ लाख ३० हजार ७५५ रुपये, तर २२ कोटी २४ लाख २८ हजार ७०० रुपयांच्या मूळ अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे.यंदा बजेटमध्ये जिल्ह्यात महत्वाकांक्षी असलेल्या तालुक्याचे डेल्टा रॅकिंगमध्ये सुधारणा व उपाययोनजा केल्या जाणार आहेत.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी उपाययोजना,जिल्हा परिषदे शाळेतील विद्यार्थ्याकरीता शैक्षणिक सहल,शेतीचे कुंपनाकरीता साैर उर्जेवरील झटका मशीन करीता अनुदान,स्पायरल सेपरेटर करीता अनुदान आदी नवीन योजना समाविष्ट केल्या आहेत.

विभागनिहाय तरतूद कोटी
समाज कल्याण १.७१,दिव्यांगाकरिता ७५.२२,महिला व बालकल्याण,१.१६ शिक्षण २.४६, बांधकाम ४.११,आरोग्य १.०५,पाणीपुरवठा ३.८४, पशुसंवर्धन १.०४
कृषी १.१० या प्रमाणे तरतूद केली आहे.

Web Title: Revised budget of Zilla Parishad is 27 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.