महापालिका आयुक्तांद्वारे स्वच्छ भारत अभियानाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:29 IST2020-12-13T04:29:28+5:302020-12-13T04:29:28+5:30

अमरावती : महापालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍वच्‍छ भारत अभियान अंतर्गत स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२१ यासंदर्भात सर्व ज्येष्ठ स्‍वास्थ्य ...

Review of Swachh Bharat Abhiyan by Municipal Commissioner | महापालिका आयुक्तांद्वारे स्वच्छ भारत अभियानाचा आढावा

महापालिका आयुक्तांद्वारे स्वच्छ भारत अभियानाचा आढावा

अमरावती : महापालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍वच्‍छ भारत अभियान अंतर्गत स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२१ यासंदर्भात सर्व ज्येष्ठ स्‍वास्थ्य निरीक्षक व स्‍वास्थ्य निरीक्षकांच्या कामकाजाबाबत आढावा बैठक शुक्रवारी घेण्‍यात आली. यावेळी आयुक्तांनी सर्वेक्षणाच्या सूचना उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.

स्‍वच्‍छ सर्वेक्षण संपुष्‍टात येण्‍याचा कालावधी ३१ मार्च आहे. यावेळचे सर्वेक्षण हे मार्च २०२१ पर्यंत सुरू राहील. शहराचे प्रत्‍यक्ष निरीक्षण हे दिनांक १ ते २१ मार्च दरम्‍यान होईल. त्यापूर्वी डिसेंबर अथवा जानेवारीच्‍या सुमारास शहराचे ओ.डी.एफ. पुनर्तपासणी, वॉटर व स्‍टार सर्वेक्षण होईल. यंदाच्या सर्वेक्षणामध्‍ये काही बदल झालेले आहेत. यामध्ये सिटिझन फीडबॅकचा कालावधी ४ जानेवारी ते २८ मार्च २०२१, प्रत्‍यक्ष निरीक्षण करतेवेळी सिटीझन फीडबॅक घेण्‍याचा कालावधी १ ते ३१ मार्चपर्यंत स्‍वच्‍छता ॲप कालावधी २८ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण उपक्रमांमध्‍ये नागरिकांचा सहभाग दर्शविणे. १५ फेब्रुवारपर्यंत स्‍वच्‍छता रँकिंगची अंतिम तारीख ३१ जानेवारी तसेच नवकल्‍पना ३१ जानेवारीपर्यंत संपुष्‍टात आणावयाचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

बॉक्स

ही कामे महत्वाची

१०० टक्‍के दैनंदिन वर्गीकृत कचरा संकलन करणे, प्रभागनिहाय प्रत्‍येकी दोन खतनिर्मिती प्रकल्‍प उभारणे, दैनंदिन व्‍यावसायिक, खाजगी क्षेत्रात रात्रकालीन साफ सफाई, नेहमी कचरा दिसणाऱ्या ठिकाणाचे सौंदर्यीकरण, शेणखत उचलणे, नाल्‍यांची नियमित साफ सफाई करणे. सफाई कामगारांना गणवेश, गमबुट, जॅकेट्स, हातमोजे, मास्‍क वाटप करणे. दर महिन्‍याला उत्‍कृष्‍ठ सफाई कामगार/वाहनचालक यांना सन्‍मानित करणे, सफाई कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण आयोजित करणे, प्‍लास्टिक बंदी मोहीम राबविणे, बांधकाम व विध्‍वंसक कचरा उचलणे व दंडात्‍मक कार्यवाही करणे महत्वाचे असल्याचे आयुक्त म्हणाले.

बॉक्स

स्वच्छतेविषयी जनजागृती

सामुदायिक, सार्वजनिक शौचालये व मुताऱ्या साफ सफाई करणे. ओडीएफ व स्‍टार रेटिंग प्रोटोकॉल नुसार प्रभाग निहाय तयारी करणे. सिटीझन फिडबॅक अंतर्गत नागरिकांना प्रत्‍यक्ष निरीक्षण करतेवेळी विचारण्‍यात येणाऱ्या प्रश्‍नांची सकारात्‍मक उत्‍तरे देण्‍याकरिता प्रभागनिहाय किमान ३५ घरे स्‍वच्‍छतेबाबत प्रश्‍नांची सकारात्‍मक उत्‍तरे देण्‍याकरिता तयार ठेवावीत. पदाधिकारी, नगरसेवक धार्मिक वक्‍ते, प्रभागातील नागरिक, बचत गट, अपार्टमेंट्स, एनजीओ यांना सहभागी करुन स्‍वच्‍छ सर्वेक्षणाबाबत जनजागृती करण्याच्ाय सुचना आयुक्तांनी दिल्या.

Web Title: Review of Swachh Bharat Abhiyan by Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.