पीक परिस्थितीचा आढावा
By Admin | Updated: July 15, 2016 00:31 IST2016-07-15T00:31:52+5:302016-07-15T00:31:52+5:30
जिल्ह्यात मागील चार दिवस दमदार पाऊस पडल्याने यात शेती पिकाचे नुकसान झाले आहे.

पीक परिस्थितीचा आढावा
कृषी समितीची बैठक : साहित्य वाटप करण्याचे निर्देश
अमरावती : जिल्ह्यात मागील चार दिवस दमदार पाऊस पडल्याने यात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. यासर्व परिस्थितीचा गुरूवारी जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभापती अरूणा गोरले यांनी आढावा घेवृून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत.
सलग पाऊस पडल्यामुळे ग्रामीण भागात शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे शेती पीके पाण्याखाली असल्याने तूर व इतर पिकांनाही बाधा पोहचली आहे. त्यामुळे या सभेत पीक नुकसानीचा तालुकानिहाय आढावा घेवून झालेल्या नुकसानीचा अहवाल पुढील सभेत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय कृषी विभागाने पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून दिलेले साहित्य लाभार्थ्याना तातडीने वाटप करावे, असे समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. सभेला कृषी समितीचे सभापती अरूणा गोरले, सदस्य मंदा गवई, निता जिचकार, संगिता चक्रे, विनोद टेकाडे, बाळकृष्ण सांळुके, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, वरूण देशमुख, गजानन देशमुख, एमआयडीसीचे अधिकारी एस. के. देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)