पदाधिकाऱ्यांचा आढाव्याचा धडाका
By Admin | Updated: November 10, 2014 22:35 IST2014-11-10T22:35:12+5:302014-11-10T22:35:12+5:30
जिल्हा परिषदेत नव्याने आरुढ झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार विषय समितींच्या सभापतींनी खातेवाटप जाहीर होताच जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सोमवार १० नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना

पदाधिकाऱ्यांचा आढाव्याचा धडाका
जितेंद्र दखने - अमरावती
जिल्हा परिषदेत नव्याने आरुढ झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार विषय समितींच्या सभापतींनी खातेवाटप जाहीर होताच जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सोमवार १० नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना मिळालेल्या खात्यासंबंधित कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश उईके यांनी सकाळी ११ वाजता कार्यालय गाठून आपल्या दालनात महत्वांच्या विषयांवर चर्चा करून कामकाजाचा आढावा घेतला. तर उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी १०.४५ वाजता कार्यालय गाठून काही वेळातच जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव यांच्याशी आरोग्याबाबत अर्धा तास दूरध्वनीवरून चर्चा केली. यानंतर उपाध्यक्ष तथा वित्त समितीचे सभापती सतिश हाडोळे यांनी वित्त विभागाची आढावा बैठक बोलावून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची आर्थिक स्थिती जाणून घेतली. तसेच वित्त विभागाच्या समिती सदस्यांसमवेत कामकाजाचा आढावा घेतला. याचवेळी समाजकल्याण सभापती सरिता मकेश्वर यांनी ११.३० वाजता कार्यालय गाठून समाज कल्याण अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतरभातकुली पंचायत समितीत आयोजित दलितवस्ती, साहित्य वाटप योजनांचा आढावा घेतला.