महसूल, बांधकामाच्या वादात रखडले पांदण रस्ते

By Admin | Updated: September 30, 2015 00:36 IST2015-09-30T00:36:06+5:302015-09-30T00:36:06+5:30

शेतातील पांदण रस्ते मोकळे करण्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र चांदूरबाजार-शिरजगाव बंड हा पांदण ...

Revenue, roads, roads, roads and roads | महसूल, बांधकामाच्या वादात रखडले पांदण रस्ते

महसूल, बांधकामाच्या वादात रखडले पांदण रस्ते

१० वर्षांत केले केवळ मातीकाम : सहा वर्षांपासून खडीकरणासाठी मजूर मिळालेच नाही
चांदूरबाजार : शेतातील पांदण रस्ते मोकळे करण्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र चांदूरबाजार-शिरजगाव बंड हा पांदण रस्ता १० वर्षांपासून मोकळा असतानाही केवळ मातीकाम तेवढे करण्यात आले. यासाठी दीड लाख रूपये खर्च करण्यात आला. मात्र खडीकरणाचे काम महसूल व बांधकाम विभागाच्या वादात रखडले. यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी व महसूल विभागाकडे निवेदने दिलीत. मात्र हे काम रोहयो अंतर्गत असल्यामुळे व त्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे रखडल्याचे दोन्ही विभागाकडून सांगण्यात येते.
आता बांधकाम विभागानेही सदर कामाकरिता ग्रामपंचायत मजूर उपलब्ध करून देत नसल्यामुळे बांधकाम विभागाकडून हे काम काढून घ्यावे, असे लेखी प्रस्ताव सहायक अभियंत्यांनी तहसील प्रशासन व तक्रारकर्ता संजय इंगोले यांना दिले आहे. सहा वर्षांत या ७०० मीटर रस्त्याचे ७०० मीटर मातीकाम व २०० मीटरचे मुरूम अस्तरीकरणाचे काम बांधकाम विभागाच्या चांदूरबाजार उपविभागामार्फत करण्यात आले.
२८ फेब्रुवारी २०१२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसीलदारांना दिलेल्या पत्रानुसार या पाणंद रस्त्याच्या कामाला ५ लाख ८३ हजार ५०० रूपये खर्चाची मान्यता मिळाली. त्यात ४ लाख २८ हजार ५१ रूपये अकुशल तर १ लाख ३१ हजार ५१ रूपये कुशल बाबीवर खर्च करण्याची तरतूद होती. त्यानुसार या रस्त्याच्या मातीकामाला ४ मे २००९ रोजी सुरुवात होऊन १८ जून २००९ पर्यंत मातीकाम पूर्ण झाले.
त्यावर १ लाख ५२ हजार २९१ रूपये एवढा खर्च दाखविण्यात आला. मातीकाम पूर्ण झाल्यामुळे काम बंद करण्यात आले आणि खडीकरणाचे काम सामाजिक बांधकाम विभागाकडून करण्यात येऊ शकत नाही, असे लेखी पत्र बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता यांनी तहसीलदारांना दिले.
त्यावर तत्कालीन तहसीलदारांनी बांधकाम विभागाच्या अचलपूर येथील कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या ३ मार्च २०१२ च्या पत्रानुसार या पांदण रस्त्याच्या खडीकरणासंदर्भात प्राप्त अहवालानुसार खडीकरणासाठी ९ लाख ८३ हजार ५०० रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. मातीकामावर १ लाख ५२ हजार २९१ रूपये खर्च खडीकरणावर खर्च करण्याला मंजुरी देण्याची विनंती करणारे पत्र तहसीलदारांनी बांधकाम विभागाला दिले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Revenue, roads, roads, roads and roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.