महसूल वसुलीत जिल्हा माघारला
By Admin | Updated: March 27, 2016 00:10 IST2016-03-27T00:10:25+5:302016-03-27T00:10:25+5:30
मार्चअखेरीस महसूल विभागात वसुलीबाबत प्रचंड काथ्याकुट सुरू आहे. आर्थिक वर्ष संपलाय, अवघे आठ दिवस शिल्लक असताना वसुलीचा आकडा ५८ टक्क्यांवर ...

महसूल वसुलीत जिल्हा माघारला
पाच दिवसांत ४५ टक्क्यांचे लक्ष : विभागाचे वाढले 'हार्टबीट'
अमरावती : मार्चअखेरीस महसूल विभागात वसुलीबाबत प्रचंड काथ्याकुट सुरू आहे. आर्थिक वर्ष संपलाय, अवघे आठ दिवस शिल्लक असताना वसुलीचा आकडा ५८ टक्क्यांवर स्थिरावल्याने विभागाचे हार्टबीट वाढले आहेत.
राज्य शासनाने २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या वसुलीच्या ३८७.९३ लाखांच्या उद्देशापैकी १८ मार्चपर्यंत अमरावती विभागाने २४६ कोटी ७३ लाख महसूल वसुली केली. हे प्रमाण निर्धारित उद्देशाच्या ६३.६० टक्के आहे; तथापि यातही विभागाच्या तुलनेत अमरावती जिल्हा माघारला आहे.
अमरावती जिल्ह्याची महसूल वसुली ५७.६२, अकोला ७४.७१, यवतमाळ ६७.०८, बुलडाणा ६१.३८ तर वाशिम जिल्ह्यातील वसुलीची टक्केवारी ५७.२९ टक्के आहे. अमरावती महसूल विभागाला सन २०१५-१६ साठी ३८७.९३ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार पाचही जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने महसूल वसुलीची मोहीम राबविली. ३१ मार्चनंतर १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष लागत असल्याने महसूल विभागाने वसुलीसाठी कंबर कसली आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी ८ दिवस शिल्लक असेल तरी त्यातील चार दिवस सुट्या आल्याने महसूल यंत्रणेचा ताप वाढला आहे.