'त्या' बनावट रेतीला महसूल विभागाचे अभय!

By Admin | Updated: June 26, 2016 00:08 IST2016-06-26T00:08:34+5:302016-06-26T00:08:34+5:30

येथे शासकीय भूखंडावर कारखान्यातील टाकाऊ दगड, विटांचा चुरा व नाल्यातील रेती मिसळून बनविण्यात येणाऱ्या बनावट कन्हान रेतीचा भंडाफोड लोकमतने शनिवारच्या अंकात केला.

Revenue department's Abhay! | 'त्या' बनावट रेतीला महसूल विभागाचे अभय!

'त्या' बनावट रेतीला महसूल विभागाचे अभय!

कारवाईत दिरंगाई : आजवर कारवाईसाठी टाळाटाळ
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
येथे शासकीय भूखंडावर कारखान्यातील टाकाऊ दगड, विटांचा चुरा व नाल्यातील रेती मिसळून बनविण्यात येणाऱ्या बनावट कन्हान रेतीचा भंडाफोड लोकमतने शनिवारच्या अंकात केला. या वृत्ताचे शहरवासियांंनी स्वागत केले. मात्र सुटीचे कारण दर्शवून महसूल कारवार्ई करण्यास दिरंगाई करीत असल्याने हा विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
महामार्गालगतच्या सेंट्रल नाक्याजवळ असणाऱ्या शासकीय भूखंडावर बनावट कन्हान रेती तयार करण्याचा धक्कादायक व्यवसाय होत आहे. कन्हानच्या नावे बनावट असणारी ही रेती ज्या कुण्या ग्राहकाने घेतली त्याने या वृत्तानंतर रोष व्यक्त केला. या गोरखधंद्यात मालक कधीच समोर आला नाही. येथील साहित्याची देखरेख व विक्रीची आॅर्डर रखवालदारच घेत आहे. हा सर्व व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. 'लोकमत'च्या वृत्तानंतर हा रखवालदार येथून पसार झाला. दलालांनी ही बनावट रेती विविध ठिकाणी विकली आहे. खासकरवून शासकीय कामांवर खासगी संस्थांना दिल्याची चर्चा आहे. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या या गोरखधंद्यातील सहभागांवर कारवाई करावी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.महसूल विभागाने या बाबीकडे गंभीरतेने पहावे.

रेतीच्या गोरखधंद्याचा म्होरक्या कोण ?
कारखान्यातील टाकावू दगड, विटांचा चुरा व नाल्याची रेती एकत्र करुन कन्हानच्या नावे रेती विकणारा म्होरक्या कोण? ही चर्चा 'लोकमत'च्या वृत्तानंतर समोर आली. या गोरखधंद्यात दलाल मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. कन्हानची रेती कमी भावात देऊ, अशी बनावणी करणाऱ्या दलालांनी यात नागरिकांना धोका दिला आहे.

आजवर ठोस कारवाई का नाही?
महसूल विभागाने ज्या भूखंडावर अवैध रेती विकली जात होती तेथे कारवाई केल्याचे म्हटले आहे. मात्र ज्या शासकीय भूखंडावर एकाच ठिकाणी कारखान्यातील वेस्ट दगड विटांचा चुरा व नाल्याची रेती दिसून पडते येथे बनावट रेती तर तयार होत नाही, असा प्रश्न महसूल विभागाला का पडला नाही. हा गोरखधंदा कुणाच्याही लक्षात येऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणतात.

Web Title: Revenue department's Abhay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.