मॅजिक पेनमुळे रेती माफियांची महसूल विभागाला चपराक

By Admin | Updated: September 16, 2014 23:26 IST2014-09-16T23:26:29+5:302014-09-16T23:26:29+5:30

नियम कितीही कडक असले तरीही चोरी करणारे त्या नियमांना तिलांजली देण्याच्या योजना बनवितात. सध्या वाळू माफीयांनी मॅजीकपेनच्या सहाय्याने महसूल विभागाला लाखो रूपयांची चपराक देणे सुरू केले आहे.

Revenue Department Chaparak, due to magic pen, | मॅजिक पेनमुळे रेती माफियांची महसूल विभागाला चपराक

मॅजिक पेनमुळे रेती माफियांची महसूल विभागाला चपराक

सुमीत हरकुट - चांदूरबाजार
नियम कितीही कडक असले तरीही चोरी करणारे त्या नियमांना तिलांजली देण्याच्या योजना बनवितात. सध्या वाळू माफीयांनी मॅजीकपेनच्या सहाय्याने महसूल विभागाला लाखो रूपयांची चपराक देणे सुरू केले आहे.
वाळुमाफीया नवनवीन शक्कल लढवून चोरट्या मार्गाने रेती चोरीचा व्यवसाय करीत आहे. कधी राजकीय पाठबळ घेत तर कधी महसूल विभागाशी संगनमत करून वाळुमाफीया शासनाच्या तिजोरीवर हल्ला मारत आहे. तालुक्यातील अनेक रेतीघाट अद्यापपर्यंत हर्रास झाले नसून या वर्षीचा रेती उपसाचा कार्यकाळाला सुद्धा १५ दिवसही शिल्लक राहीलेले नाही. अशातच वाळुमाफीया मिळेल त्या मार्गाने रेती गोळा करीत आहे. नियम धाब्यावर बसवून रेतीचा उपसा सुरू आहे.
यंदा कुरळपूर्णा येथील रेतीघाटाचा हर्रास झाला नाही. परंतु तरीही या रेतीघाटाची रेतीची सर्वाधिक मागणी असल्याने वाळुमाफीया या रेतीघाटावरून छुप्या मार्गाने रेतीची तस्करी करतो. याकरिता कोदोरी येथील रेतीघाटच्या पासेस बनवून रेती मात्र कुरळपूर्णा येथील रेती घाटाची रेती उपसा करून विक्री करण्यात येते. या पासेसवर तारखेचा शिक्का मारलेला असून ट्रॅक्टरचा वाहतुकीची वेळ ही निळ्या जेल पेनने लिहीलेली असते. मात्र वाळु माफीयांनी आता पेनाने लिहीलेली वेळ बदलविण्याकरिता नवीन १४५ रुपये किंमतीच्या पेनाचा वापर करतात. या मॅजीक पेनच्या वरच्या बाजूस १ इरेजर आहे त्याने त्या लिहीलेल्या कागदावर घासल्यास कागदावरील लिहीलेले पूर्णत: मिटून जाते. त्यानंतर वाळुमाफीया आपल्या सोयीनुसार त्या पावतीवरील वेळ टाकतात. या तऱ्हेने १ ट्रॅक्टर दररोज फक्त एकच वाहतूक पास बनवीत असून दिवसभर वेळेचा फेरबदल करून ४ ते ५ खेप विना पावतीचीच मारून महसूल विभागाला मुर्ख बनवित आहे.काही वाळू माफीयांनी तर लिलाव झालेल्या रेतीघाटवरील वाहतूक पास बनविण्यासोबत ‘सेटींग’ केले असून या पेनाचा उपयोग पावतीवर लिहिण्याकरिता सुद्धा होतो. परंतु काही काळानंतर हे लिहीलेले अस्पष्ट दिसू लागतात त्यामुळे या पावतीला ट्रॅक्टरच्या गरम सायलेंसरला लावताच यावरील लिहीलेले पुन्हा दिसू लागतो. वाळुमाफीयाचा या मॅजीक पेनमुळे महसूल विभागाला मोठी चपराक बसत असली तरी नदीतील सुरू असलेले अवैध अत्खनक हानून पाडण्याचे धाडस महसूल विभागाने अद्यापही दाखविलेले नाही. या मॅजीक पेनने महसूल विभागाचे लाखोंचा महसूल बुडत असून फक्त कार्यवाहीच्या नावावर दंडाची रक्कम वसूल करण्यात येत असून दररोज ४० ते ४५ ट्रॅक्टर कुरळपूर्णा नदीपात्रातून शेकडो ब्रास रेती दररोज उपसा करीत आहे. एकीकडे कोदोरी येथील गावकऱ्यांनी नागरिकांच्या हिताकरिता कठोर पाऊले उचलत लिलाव होऊनही रेतीघाटाचा मार्ग बंद केला असताना कुरळपूर्णा येथील रेतीघाटावर आणण्याकरिता कुरळपूर्णा, मासोद या गावातील पोलीस पाटील, सचिव, तलाठी, मंडळ अधिकारी सर्रास दिवस-रात्र होत आहे.

Web Title: Revenue Department Chaparak, due to magic pen,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.