महसूल प्रशासन घेत आहे माहिती चिखलदरा अतिवृष्टीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST2021-07-23T04:10:40+5:302021-07-23T04:10:40+5:30
चिखलदरा : बुधवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या पावसाची माहिती गुरुवारी दिवसभर महसूल प्रशासनाने घेतली. त्यात अनेक मार्ग बंद, तर काही ठिकाणी ...

महसूल प्रशासन घेत आहे माहिती चिखलदरा अतिवृष्टीचा फटका
चिखलदरा : बुधवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या पावसाची माहिती गुरुवारी दिवसभर महसूल प्रशासनाने घेतली. त्यात अनेक मार्ग बंद, तर काही ठिकाणी दरड कोसळण्याचा शेत वाहून गेल्याचे वृत्त आहे.
सेमाडोह मार्ग बंद आहे. कालापांढरी हिरदामल चिचाटीच्या जामूननाल्याला पूर असल्यामुळे हा मार्ग बंद आहे
बदनापूर, वस्तापूर, कुलंगणा बु., चिचखेड़ा येथील नदीवरून पाणी वाहून जात असल्याने रस्ते बंद आहेत.
सततधार सुरु असलेल्या पावसामुळे गौलखेडा बाजार मंडळात एकझिरा येथील एका घराचे अंशत: नुकसान झाले. इतर मंडळात मिळालेल्या माहितीनुसार, कोणतेही नुकसान झाले नाही तसेच जीवितहानी झाली नाही. जानकी लक्ष्मण चतुरकर (रा. टेम्ब्रुसोंडा) यांचे अंशतः घर पडले. मौजा मनभंग येथे एक घराचे अंशतः नुकसान झाले. मौजा आडनदी, भिलखेडा व भांद्री येथे नदीकाठच्या शेतातून पाणी गेले आहे.
मौजा खिरपाणी, सावरपाणी व गरजदरी येथील नदीकाठावरील अंदाजे २५ खातेदारांच्या १८ हेक्टर शेतजमिनीचे व पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याची माहिती महसूल प्रशासनाचा जवळ असल्याचे तहसीलदार माया माने यांनी सांगितले.
बॉक्स
सेमाडोह माखला मार्गावर दरड कोसळली
सेमाडोहपासून चार किलोमीटर अंतरावर माखला मार्गावरील मांग्या देव नजीक दरड कोसळल्याने मार्ग पूर्णत: बंद झाला आहे. हा मार्ग जिल्हा परिषद अंतर्गत असून, सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते.