परतीच्या पावसाची हॅट्ट्रिक

By Admin | Updated: October 5, 2014 22:55 IST2014-10-05T22:55:48+5:302014-10-05T22:55:48+5:30

महिनाभर पावसाने दांडी मारल्यानंतर शुक्रवार, शनिवार व रविवारी सलग तीन दिवस परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावून हॅट्ट्रीक केली.धुंवाधार पाऊस कोसळल्यानंतरही उकाडा मात्र कायम आहे.

Returning hatcheric | परतीच्या पावसाची हॅट्ट्रिक

परतीच्या पावसाची हॅट्ट्रिक

उकाडा कायम : सोमवारी पुन्हा पावसाची शक्यता
अमरावती : महिनाभर पावसाने दांडी मारल्यानंतर शुक्रवार, शनिवार व रविवारी सलग तीन दिवस परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावून हॅट्ट्रीक केली.धुंवाधार पाऊस कोसळल्यानंतरही उकाडा मात्र कायम आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते सोमवारी सुध्दा पाऊसधारा बरसण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर हा पावसाचा अखेरचा महिना. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आॅक्टोबरच्या सुरुवातीला मात्र पाऊस पडल्याने नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला. मागील काही दिवसांमध्ये तापमानात वाढ झाली असून सप्टेंबरच्या सुरुवातीला २५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचलेले तापमान आज ३२ ते ३५ डिग्रीपर्यंत वाढल्याने उकाडा निर्माण झाला आहे. सप्टेंबर महिन्यातील शेवटचे दिवस व आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला वापशामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असून सोमवारी पुन्हा तुरळक पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Returning hatcheric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.