परतीच्या मान्सूनचा विदर्भात १५ आॅक्टोबरपर्यंत मुक्काम
By Admin | Updated: October 8, 2014 22:57 IST2014-10-08T22:57:13+5:302014-10-08T22:57:13+5:30
विदर्भापासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहात आहेत. परतीच्या मान्सूनचा मुक्काम १५ आॅक्टोबरपर्यंत राहणार असल्यामुळे दुपारच्या वेळी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

परतीच्या मान्सूनचा विदर्भात १५ आॅक्टोबरपर्यंत मुक्काम
वैभव बाबरेकर - अमरावती
विदर्भापासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहात आहेत. परतीच्या मान्सूनचा मुक्काम १५ आॅक्टोबरपर्यंत राहणार असल्यामुळे दुपारच्या वेळी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
गेल्या तीन दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मुक्ती मिळाली. सध्या दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशा वातावरणाचा अनुभव अमरावतीकर घेत आहे. श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने बुधवारपर्यंत त्याचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता होती. विदर्भावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच लक्षदीप व ओडीशाच्या किनारपट्टीवर सुध्दा चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे विदर्भातील तुरळक ठिकाणी दुपारच्या वेळेत पावसाची शक्यता आहे. तसेच परतीचा मान्सून येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत मुक्कामी राहणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. परतीच्या मान्सूनचा मुक्काम वाढल्याने जिल्ह्यात कधीही पाऊस बरसू शकतो. ढगाळी वातावरण व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.