परतवाड्यात दोन कोरोना संक्रमित दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST2021-02-27T04:15:29+5:302021-02-27T04:15:29+5:30
फोटो पी २६ अनिल कडू फोल्डर परतवाडा : स्थानिक दोन कोरोना संक्रमितांचा उपचारादरम्यान दोन दिवसांत मृत्यू झाला. नागसेननगरातील ६९ ...

परतवाड्यात दोन कोरोना संक्रमित दगावले
फोटो पी २६ अनिल कडू फोल्डर
परतवाडा : स्थानिक दोन कोरोना संक्रमितांचा उपचारादरम्यान दोन दिवसांत मृत्यू झाला. नागसेननगरातील ६९ वर्षीय पुरुषाचा जिल्हा कोविड रुग्णालयात २४ फेब्रुवारी रोजी, तर सदर बाजारातील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा अमरावती येथील खासगी रुग्णालयात २५ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. सदर बाजारात कोरोना संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे.
अचलपूर तालुक्यांत २४ आणि २५ फेब्रुवारी या दोन दिवसात शंभरावर कोरोना संक्रमित रुग्ण नोंदवले गेले. यात अचलपूर, परतवाडा शहरासह देवमाळी व कांडली येथील रुग्णसंख्या अधिक असून, दररोज कोरोना संक्रमित रुग्ण निघतच आहेत.
अचलपूर नगर परिषदेचे माजी प्रभारी मुख्याधिकारी सुमेध अलोनेदेखील कोरोना संक्रमित निघाले आहेत. यापूर्वी त्यांची दोन्ही मुले कोरोना संक्रमित निघाल्यामुळे ते वैद्यकीय रजेवर गेले आहेत.
कोरोना संक्रमितांची वाढती संख्या आणि होत असलेल्या मृत्यूमुळे अचलपूर नगर परिषद प्रशासनासह नगरसेवकही ॲक्शन मोडमध्ये आले आहे. प्रभारी मुख्याधिकारी गीता ठाकरे अधिनस्थ कर्मचाऱ्यांसह सकाळपासूनच शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासोबतच सामाजिक अंतरासह मास्क आणि कोरोना नियमावलीचे पालण करण्याबाबत नागरिकांना आावाहन करीत आहेत.
शहरात सहा पथके सक्रिय आहेत. पोलीसही त्यांना सहकार्य करीत आहेत. जुळ्या शहरातील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण टप्प्याटप्प्याने केले जात आहे. यात नगराध्यक्ष सुनीता फिसके, नगरसेवक गोवर्धन मेहरे, सल्लूभाई, मनोज जामनेकर, प्रविण पाटील, संजय तट्टे, किरण मालू, बंटी ककरानिया, बंटी उपाध्याय, सोना थावाणी, मनोज नंदवंशी, अक्षरा रूपेश लहाने, किरण मालू यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी लक्ष घातले आहे. ते स्वत: आपआपल्या प्रभागातही निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वास नेत आहेत. पाच दिवसांपासून नगर परिषदेची यंत्रणा सक्रिय झाली आहे.
बॉक्स
एक लाखाचा दंड वसूल
कोरोना नियमावली न पाळणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांकडून १७ फेब्रुवारीपासून १ लाख ६ हजार रुपयाचा दंड अचलपूर नगर परिषदेने वसूल केला. यात पोलिसांसह महसूल विभागाचे त्यांना सहकार्य लाभले.
कोट
अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील १९ प्रभागांपैकी १३ प्रभागांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. येत्या रविवारपर्यंत सर्वच प्रभागातील निर्जंतुकीकरण पूर्णत्वास नेले जाणार आहे. जुळ्या नगरीतील कंटेनमेंन्ट झोनसह कोरोना संक्रमित रुग्णांच्या घराचे व लगतच्या परिसराचे प्राधान्याने निर्जंतुकीकरण केले जात आहे. सफाई कर्मचारी स्वच्छतेवर लक्ष देवून आहेत.
-बंटी ककरानिया, आरोग्य व स्वच्छता सभापती, नगर परिषद, अचलपूर.
0000