सुकळी येथील प्रकल्पाच्या शेतजमिनी परत द्या
By Admin | Updated: May 6, 2015 00:17 IST2015-05-06T00:17:52+5:302015-05-06T00:17:52+5:30
महापालिकेने सुकळी येथील प्रकल्पासाठी शेत जमिनी संपादित केली होती. ११ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीनुसार...

सुकळी येथील प्रकल्पाच्या शेतजमिनी परत द्या
निवेदन : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आयुक्तांकडे मागणी
अमरावती : महापालिकेने सुकळी येथील प्रकल्पासाठी शेत जमिनी संपादित केली होती. ११ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीनुसार सदर शेतजमिन शेतकऱ्यांना विना विलंब शेतीकरीता परत करण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली अकरा फेब्रुवारीला आयुक्त यांच्या कार्यालयात पार पडली होती या बैठकीत सुकळी येथील प्रकल्पग्रस्ताना तेथील शेतजमिनी परत देण्याची मागणी केली होती यानुसार पालकमंत्री यांच्या उपस्थितीत ही जमीन परत करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता.यावेळी बैठकीला महापालिका सभागृहाचे नेते बबलु शेखावत, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, तुषार भारतिय, चेतन पवार, अविनाश मार्डीकर, अजय गोंडाणे, प्रविण हरमकर, प्रदिप दंदे, अब्दुल रफिक आदी नगरसेवक व माजी नगरसेवक बबन रडके आदीची उपस्थिती होती.या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यासंदर्भात कार्यवृत्त तयार करण्यात आले. आयुक्त व पालकमंत्री यांनी बारमाही पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्या शेतजमिनी परत देण्याचे सचिविले होते.जेणेकरूण हे शेतकरी भूमिहीन होणार नाहीत.आणि त्याना आपली उपजिवीका करता येईल असा निर्णय झाल्याने या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेत जमिनी परत देण्याची मागणी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी बबन रडके, भानुदास लंगडे, रमेश गुलवाडे, रश्मीदेवी वर्मा उपस्थित होते.