ठळक मुद्देबांधिलकी : कोरोना प्रतिबंधाबाबत जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : देशावर कोरोनाच्या रुपात राष्ट्रीय संकट ओढवले आहे. त्या संकटावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा राबत असताना येथील माजी सैनिकही सरसावले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी जागर चालविला आहे.तालुक्यातील १५ माजी सैनिकांसोबतच सुट्टीवर आलेले तीन सैनिक रोज सकाळी अंजनगाव शहरांमध्ये पोलिसांनी लावलेल्या वेगवेगळ्या पॉइंंटवर नि:स्वार्थपणे कुठलाही मोबदला न घेता सेवा देत आहेत. संचारबंदीच्या काळात हे सेवानिवृत्त सैनिक पोलिसांसोबत खंबीरपणे उभे आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे, ठाणेदार राजेश राठोड यांनी या सर्व सेवानिवृत्त सैनिकांचे तसेच रजेवर आलेले आणि सध्या सेवा देत असलेल्या तीन सैनिकांचे कौतुक केले आहे.