न्यायालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला २४ हजारांचा गंडा

By Admin | Updated: June 23, 2017 00:13 IST2017-06-23T00:13:49+5:302017-06-23T00:13:49+5:30

जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल २४ हजार

A retired employee of the court has given a loan of 24 thousand | न्यायालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला २४ हजारांचा गंडा

न्यायालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला २४ हजारांचा गंडा

बँक आॅफ इंडियातील घटना : फसवणुकीचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल २४ हजार ९९७ रुपये अज्ञाताने काढून घेतल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. देवरणकर नगरातील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार घडला असून याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
प्रदीप शंकर इंगोले (५९,रा. देसाई लेआॅऊट, गणेश कॉलनीमागे) यांच्याकडे बँक आॅफ इंडियाचे बचत खाते आहे. हा प्रकार बँकेतच झाला असावा, असा संशय इंगोले यांनी वर्तविला आहे. या फसवणुकीसंदर्भात त्यांनी बुधवारी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला असून पुढील चौकशी आरंभली आहे.

Web Title: A retired employee of the court has given a loan of 24 thousand