पावसाअभावी सुकलेल्या रोपट्यांना नवजीवन
By Admin | Updated: August 20, 2014 23:15 IST2014-08-20T23:15:12+5:302014-08-20T23:15:12+5:30
२० दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी पाऊस बरसल्याने वडाळीतील नर्सरीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पावसामुळे सोकण्याच्या स्थितीत रोपटे पुन्हा पल्लवीत झाले आहे. या पावसामुळे

पावसाअभावी सुकलेल्या रोपट्यांना नवजीवन
वडाळी नर्सरीचे सौंदर्यात भर : वृक्ष संवर्धनाला मदत
अमरावती : २० दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी पाऊस बरसल्याने वडाळीतील नर्सरीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पावसामुळे सोकण्याच्या स्थितीत रोपटे पुन्हा पल्लवीत झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील वृक्ष संवर्धनाला मदत मिळाली आहे.
गेल्या २२ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष संवर्धनाची कुणकुण जाणवत होती. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आल्याने हजारो रोपट्यांना पाण्याची आवश्यकता होती. गेल्या २२ दिवसांपासून वृक्षारोपणात लावलेली रोपटी पाण्याविना तग धरुन होते. अशीच परिस्थिती वडाळीतील नर्सरीमध्येही पाहायला मिळाली. वडाळी वनपरिक्षेत्रामध्ये विविध प्रजातीच्या १ लाख वृक्षांचे रोपन करण्यात आले आहे. या रोपट्यांना जगविण्यासाठी विशेष सोय वडाळीतील नर्सरीमध्ये करण्यात आली आहे. निम, बांबू, साग, चिकू, पिंपळ, निलगिरी अशा विविध प्रजातींच्या सुमारे १ लाख रोपट्यांचे रोपन वडाळीत करण्यात आले आहे. गेल्या २२ दिवसांमध्ये पाऊस न पडल्याने रोपटे जगतील का असा प्रश्न वनविभागासमोर होता. मात्र मंगळवारी बरसलेल्या पावसामुळे रोपट्यांना संजीवनी मिळाली आहे. वडाळीचे नक्षत्र वन हिरवळीने बहरले आहे.